चंद्रपूरमध्ये पार पडली आम आदमी पक्षाची झाडू यात्रेनिमित्त जाहीर सभा

0
242
चंद्रपूरमध्ये पार पडली आम आदमी पक्षाची झाडू यात्रेनिमित्त जाहीर सभा
चंद्रपूर, 11 ऑक्टोबर : आम आदमी पक्षाच्या वतीने आयोजित झाडू यात्रा निमित्त चंद्रपूर येथील गांधी चौक येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे आणि प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई संघटक भुषण ढाकुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाडू यात्रा काढण्यात आली.
यावेळी धनंजय शिंदे यांनी भाषणात बोलताना, “आम आदमी पक्ष महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमचे सरकार आले तर आम्ही जनतेची खरोखर सेवा करू. आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि अन्यायाला थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.”
संदीप देसाई यांनी भाषणात बोलताना, “चंद्रपूर जिल्ह्यातील जनता आम आदमी पक्षाला भरभरून प्रेम देत आहे. लवकरच आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्ह्यातही सत्तारूढ होईल.”असा विश्वास व्यक्त केला.
या सभेला आम आदमी पक्षाचे , मयूर दोंडकार, सुनील देवराव मुसळे, मयूर राईकवार, सुरज ठाकरे, संतोष दोरखंडे, योगेश गोखरे,राजु कुंडे संतोष बोपचे,देवेंद्र अहेर. योगेश मुऱ्हेकर आणि सुनील भोयर या मान्यवरांनी उपस्थिती लावली. या सभेत मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
दरम्यान, विदर्भाचा दौरा करून हिंगणघाट मार्गे आम आदमी पक्षाची विदर्भ झाडू यात्रा आज १० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाली. झाडू यात्रेचे जिल्हाचे प्रवेशद्वार खांबाडा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वरोरा आणि भद्रावती येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरपासून सेवाग्राम वर्धा येथून विदर्भ झाडू यात्रेला प्रारंभ झाला. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा , अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि हिंगणघाट येथून ही यात्रा आता चंद्रपूर जिल्ह्यात आली आहे. खांबाडा येथे झाडू यात्रेचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित होते. वरोरा येथे देखील झाडू यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी झाडू यात्रेचे जिल्हा संयोजक सुनील मुसळे आणि जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी स्वागत केले. वरोरा येथील आनंदवन चौकात स्वागत, त्यानंतर हायवेने  रत्नमाला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि नंदोरी येथे स्वागत झाले. भद्रावती येथे झाडू यात्रेची जनसभा झाली. यावेळी, आम आदमी पार्टीचे नेते सुनील मुसळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आम आदमी पक्ष लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल. आम आदमी पक्ष हा लोकशाहीचा पक्ष आहे आणि तो सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करतो. एक एक व्यक्ती जोडू, आम आदमीला बळकट बनवू, अशी घोषणा देण्यात आले.
सुनील देवराव मुसळे यात्रा संयोजक यांनी सांगितले की, आम आदमी पक्षाला मजबूत बनवण्यासाठी आम्हाला प्रत्येक व्यक्तीला जोडण्याची गरज आहे. आम्ही आमच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी झटत आहोत. झाडू यात्रेच्या माध्यमातून, आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्ह्यात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. झाडू यात्रेचा उद्देश आम आदमी पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करणे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे, असेही ते म्हणाले. या यात्रेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here