शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन महिला जखमी 

0
507

शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन महिला जखमी 

वणी : शेतात काम करतांना अचानक आलेल्या पाऊसा सोबत कडाक्यात विज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु तर 2 महिला जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वरझडी (गोपालपुर)गावात घडली आहे. शंकर गणपत लोणबले (४०) असे मृतकाचे नाव आहे तर पिंगला पुंडलिक लोणबले (४५), सुचिता मारोती काळे (४५) असे असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे.
वरझडी (गोपालपुर) येथिल मृतक शंकर गणपत लोणबले यांच्या शेतात आज दि.७ जुलै ला मशागतीचे काम सूरु होते. दुपारी ३ वाजताचे दरम्यान अचानक विजेच्या गडगड़ा सह मुसळधार पाऊस सूरु झाला.त्यामुळे झाडाखाली उभे असलेल्यांच्या आंगावर विज पडून शेतमालकाचा मृत्यू झाला असून २ महिला जखमी झाल्या आहे.यातील सुचिता मारोती काळे हिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले तर पिंगला पुंडलिक लोणबले चा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here