सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार
आवाळपूर : नांदा परिसरातील संपूर्ण अंगणवाडीच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये कोरला योद्धा म्हणून ज्यांनी कार्य पार पाडले अशा सर्वांचा सत्कार कोविंड किट देऊन पर्यवेक्षिका श्रीमती मीनाताई परचाके यांच्या हस्ते करण्यात आला तसेच महिला व बालकल्याण विभाग द्वारे सुरू असलेल्या माझी कन्या भाग्यश्री ज्यामध्ये दोन मुली वरती कुटुंबनियोजन करणाऱ्या पात्र लाभार्थी स्त्रियांचा सुद्धा सत्कार करण्यात आला प्रथमता पर्यवेक्षिका परचाके यांचे असते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अंगणवाडी सेविका मायाताई वाटेकर चंद्रकला बोर्डे सुषमा खिरडकर ज्योती चौधरी रेखा शिरसागर मुन्नी शेख माधुरी हिवरे मंगला वाघाडे मंजुषा वाघाडे माधुरी भांडारकर अर्चना कुरसंगे नीतू तडसे मेघाली लिपटे छबुताई अतका रे व सर्व मदतनीस यांनी सहकार्य केले कोरोना योग ध्यान करिता पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून किट पुरवण्यात आल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
