“चकफूटाना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी”

0
607

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत चकफूटाना येथे सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन/राष्ट्रीय महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य व सेवा देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.शोध सावित्रीचा या अभिनव उपक्रमाद्वारे गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
शोध ज्योतिबाचा या अभियानाद्वारे महिलांना त्यांच्या प्रत्येक कार्यात साथ देणाऱ्या पुरुषांचा सत्कार हा अभियान राबवणार असा निर्णय सर्वानुमते निर्णय झाला. यामुळे समाजात समानता आणता येईल.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने जगता येईल.कार्यक्रमात गरोदर मातांचे ओटीभरण कार्यक्रम सुद्धा साजरा करण्यात आला.तसेच
अंगणवाडी मुलांची उंची,वजन घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण,शिक्षण,संस्कार,व सुरक्षा या गोष्टी कडे लक्ष कसे देता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे तालुका समन्वयक धर्मेंद्र घरत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण व पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. समाजात मुली व महिलांना आतासुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करावे लागतील.महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणा साठी महिलांना सर्व क्षेत्रात संधी द्यायला पाहिजे असे प्रतिपादन केले.यासाठी त्यांचे अभियान सलग तीन वर्षांपासून चंद्रपूर जिल्यातील ४२ गावामध्ये कार्यरत आहे.महिला बचत गट व क्षमता बांधणी,महिलांना उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, चांगले आरोग्य व पोषण,मासिक पाळी व्यवस्थापन, चांगले आरोग्याच्या सोयीसुविधा, महिला अत्याचार,ग्रामविकासात महिलांचा सहभाग अश्या अनेक विषयांवर कार्य करीत आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
अंगणवाडी सेविका माधुरी बोंमावर,CTC कोमल बिस्वास, महिला ग्रामसंघ अध्यक्ष जीवनकला पुडके, पशुसखी,उद्योगसखी व महिला व लहान मुले मुली उपस्थित कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here