ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे शोभायात्रेचे स्वागत

0
201

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे शोभायात्रेचे स्वागत

शोभायात्रेत सहभागी शीखबांधवांना शीतपेय वाटप

घुग्घुस : शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरुगोविंद सिंह यांच्या ३५८ व्या प्रकाश गुरु पुरब पर्व निमित्त रविवार, १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता महान नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शीखबांधवांतर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

याप्रसंगी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे नायब तहसीलदार कार्यालया जवळ शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच शोभायात्रेत सहभागी शीखबांधवांना शीतपेय वाटप करण्यात आले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख,पोलिस उप निरीक्षक अशोक बोढे,भाजपाचे संतोष नुने,सिनू इसारप,अनिल बाम, बबलू सातपुते,गणेश कुटेमाटे, हेमराज बोंबले, तुलसीदास ढवस, सुनील राम, धनराज पारखी, असगर खान, सुरेंद्र जोगी, कोमल ठाकरे, पियुष भोंगळे, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, पूजा दुर्गम, आदींची उपस्थिती होती.

घुग्घुसच्या गुरुद्वारा सिंह सभा पासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत मोठ्या संख्येत शीखबांधव सहभागी झाले होते. नवीन बसस्थानक, आठवडी बाजार, गांधी चौक, जुना बसस्थानक मार्गे मार्गक्रमण करीत घुग्घुसच्या गुरुद्वारा सिंह सभा जवळ शोभायात्रेचे समापन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here