विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारिरिक विकासासाठी शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव महत्वाचे – आ. किशोर जोरगेवार

0
332

विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारिरिक विकासासाठी शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव महत्वाचे – आ. किशोर जोरगेवार

बल्लारपूर येथील केजीएन पब्लिक स्कुल व महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन

इंटरनेटच्या युगात विद्यार्थी मातीच्या खेळांकडून दुरावला जात आहे. त्यामुळे त्यांच्यात खेळांची आवड निर्माण करण्यासाठी स्कुल काॅन्व्हंेट स्तरावर आता शर्तीचे प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक शाळा महाविद्यालये आता शिक्षणासह क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्राची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करत असुन विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारिरिक विकासासाठी शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

बल्लारपूर येथील केजीएन पब्लिक स्कुल व महाविद्यालय येथे सांस्कृतिक क्रिडा महोत्सव आणि वार्षिक स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केजीएन पब्लिक स्कुलचे संस्थापक अध्यक्ष शेख मेहमुद, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते घनशाम मुलचंदानी, माजी नगरसेवक सिक्की यादव, डाॅ. अभिलाषा गावतुरे, जेष्ठ पत्रकार वसंता खेडेकर, केजीएन पब्लिक स्कुल चे मुख्याध्यापीका प्रकृती गायकवाड आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचे काम केजीएन पब्लिक स्कुलच्या वतीने केल्या जात आहे. शिक्षणासह क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्राकडेही विद्यार्थ्यांना वळविण्याचे सुरु असलेले संस्थेचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. गरिबीमुळे कोणाचेही शिक्षण सुटता कामा नये ही आपली भुमिका आहे. गरिब गरजु विद्यार्थ्यांना अभ्यासिकांमध्ये नि:शुल्क अभ्यास करता यावा यासाठी आपण मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करत आहोत. यातील सात अभ्यासिकांचे काम प्रगतिपथावर असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

केजीएन पब्लिक स्कुल व महाविद्यालयाच्या वतीने वार्षिक स्नेहमीलन कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देत त्यांना सुसंस्कृत बनविण्यासाठी असे आयोजन गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनीही या शालेय कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे यातुन आपल्यातील कलाकौशल्य सादर करीत आपला सर्वांगीक विकास साधावा असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार या मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here