उपराजधानी नागपूरात पार पडलेल्या बैठकित सुवर्णा लाेखडेंची भारत स्वाभिमान जिल्हा महामंत्री पदी निवड

0
272

उपराजधानी नागपूरात पार पडलेल्या बैठकित सुवर्णा लाेखडेंची भारत स्वाभिमान जिल्हा महामंत्री पदी निवड

 

काेरपना/प्रविण मेश्राम : पतंजली योग समिती, किसान समिती, युवा समिती,भारत स्वाभिमान यांचे वतीने महाराष्ट्र पूर्वची प्रादेशिक बैठक नागपूरच्या रेशिम बाग येथील हेगडेवार भवनात नुकतीच पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून २०० पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित हाेते.

आयोजित बैठकीत बऱ्याच विषयावर सविस्तर चर्चा झाली. तदवतचं या बैठकीत आलेल्या सर्व विषयाला मान्यता देण्यांत आली .महाराष्ट्रामध्ये नव्याने जे नव्याने पदाधिका-यांचे पदे भरली त्यांस देखिल सर्वांनुमते या बैठकीत मंजूरी दिली .दरम्यान चंद्रपूरच्या नवीन भरलेल्या सर्व पदाधिकां-याच्या जागांना सुद्धा प्रांत अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्या असल्याचे एका पदाधिका-याने आज या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले .सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असणां-या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या चंद्रपूर सदस्या सुवर्णा लाेखंडे यांची भारत स्वाभिमान जिल्हा महामंत्री पदी नव्यानेच निवड करण्यांत आलेली आहे .नागपुरात पार पडलेल्या या बैठकीला प्रामुख्याने भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी विजय चंदावार,जिल्हा कोषाध्यक्ष मुरलीधर शिरभये, पतंजली योग समितीचे जिल्हा उपप्रभारी रमेश ददगाल, महाराष्ट्र प्रांतचे प्रभारी दिनेश राठोड, कोषाध्यक्ष कोटकर ,महाराष्ट्र प्रांतचे युवा प्रभारी शंकर नागापुरे, चंद्रपूर जिल्ह्याचे पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी भगवान पालकर, जिल्हा पतंजली योग समितीचे संघटन मंत्री शरद व्यास आदीं उपस्थित होते.सभेची व्यवस्था नागपूर चमुनी सुरेख केली होती.

सुवर्णा लाेखंडेचे केले अनेकांनी अभिनंदन! भारत स्वाभिमान जिल्हा महामंत्री सुवर्णा लाेखंडे यांची नियुक्ती झाल्या बद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या नागपूर निवासी मुख्य मार्गदर्शिका व याेगा शिक्षिका मायाताई काेसरे , राजू-याच्या अधिवक्ता मेघा धाेटे , सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका सुविद्या बांबाेडे , सारीका खाेब्रागडे , सराेज हिवरे , नितू जैस्वाल , नंदीनी लाहाेळे , मंथना नन्नावरे , रानी राेहने , श्रध्दा हिवरे , रसिका ढाेणे , सुवर्णा कुळमेथे , स्मिता बांडगे , विजया तत्वादी , प्रतिक्षा मैदपवार , मनिषा मडावी , छबूताई वैरागडे , सविता भाेयर , संजिवनी धांडे , उज्वला यमावार , प्रतिक्षा झाडे , विजया भांगे , अर्चना चावरे , नयना झाडे अल्का सदावर्ते आदींनी अभिनंदन केले आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here