बाटनिकल गार्डन च्या उत्कृष्ट कार्याबद्दल वनरक्षक देवराव टेकाम यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार

0
530

बाटनिकल गार्डन च्या उत्कृष्ट कार्याबद्दल वनरक्षक देवराव टेकाम यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार

प्रतिनिधी :- राज जुनघरे
बल्लारपूर/चंद्रपूर/ विदर्भ :-
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे बल्लारपूर बाटनिकल गार्डन मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल येथील वनरक्षक देवराव टेकाम यांचा मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला
जागतिक पर्यावरण दिन निमित्य आज मध्य चांदा वन विभागाचे सभागृहात विशेष सत्कारचा व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपवनसंरक्षक अरविंद मुंढे,सहायक वनसंरक्षक कोडापे,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल आदी मान्यवर उपस्थित होते
वनरक्षक टेकाम मागील चार वर्षापासून अहोरात्र मेहनत घेऊन बल्लारशा चे बॉटनिकल गार्डन विकासात मोलाचे कार्य केलेले आहे. यापूर्वी देवराव टेकाम यांनी पोंभुर्णा येथील निसर्ग पर्यटन संकुल येथे काम केले आहे बल्लारपूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्यावर बॉटनिकल गार्डन बल्लारशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती जबाबदारी त्यांनी स्वीकारून रोपवाटिकेत दहा ते बारा फुटापर्यंत उंच व पंधरा ते वीस सेंटीमीटर गोलायीचे विविध प्रजातीचे रोपे तयार केलेले आहेत.. असे यशस्वी रोपवाटिका व बाटनिकल गार्डन मधील इतर कामे देवराव टेकाम शक्य करून दाखवले आहे. त्या तयार केलेल्या रोपांचे बिजाई लावल्या पासून प्रत्येक झाडाचे जीपीएस रिडींग सह नोंद व त्याचे रेकॉर्ड करून ठेवलेले आहे रोपवाटिका व या परिसरातील कामासाठी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱयांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच हे कार्य करू शकलो अशी प्रतिक्रिया वनरक्षक देवराव टेकाम यांनी व्यक्त केली
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जागतिक पर्यावरण दिन निमित्य सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास माध्यचांदा वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी,पुरस्कार प्राप्त वनपाल,वनरक्षक,वनमजूर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here