प्रभु श्री राम भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार
विवेक नगर येथे राम जन्मोत्सव आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन
एखाद्या सुव्यवस्थित आणि संपन्न राज्यासाठी ‘राम राज्य‘ या शब्दाचा वापर केला जातो. आपल्या जीवनात प्रत्येक रूपाने राम एकरूप झालेला आहे. आजही एकमेकांना भेटतांना आपण राम राम शब्दाचा वापर करतो, ही आपली संस्कृती असुन प्रभु श्री राम हे या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
विवेक नगर येथील श्री राम मंदिरात रामजन्मोत्सव आणि राम मंदिरासाठी सहकार्य करणाऱ्या दानशूरांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचाही सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी कथा वाचक अरविंद शास्त्री महाराज, रामभाऊ चोपडे, सदानंद खत्री, देवेंद्र मोगरे, नरेंद्र काबु महाराज, नारायण कावळे, अनिल माडूरवार, विजय करमरकर, स्वप्नील कारेकर, रोहन कारेकर, माधूरी चिल्लावार, अनिल पडगीलवार, वैशाली पिंपळशेंडे, डॉ. शशांक कावळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, अलीकडे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्यतेत साजरे केले जात आहे. या उत्सवांची भव्यता दिवसागणिक वाढत आहे. एक चांगल धार्मिक वातावरण यातुन निर्माण होत आहे. भजन हे प्रभूच्या नामस्मरणासह प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे.
त्यामूळे भजन मंडळांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम आपण यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन करत आहोत. यंदा आम्ही आयोजित केलेल्या भजन महोत्सवाचा दुसरा वर्ष होता. विशेष म्हणजे, या भजन महोत्सवात जवळपास 300 विविध भाषीय भजन मंडळांनी सहभाग घेतला होता.
चंद्रपूरात आपण माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. धार्मिक वातावरण निर्मितीसह चंद्रपूरच्या माता महाकाली ची महती राज्यभरात पोहचावी, यातून येथील पर्यटन वाढावे हा या आयोजना मागचा हेतु आहे. या महोत्सवात काढण्यात आलेल्या माता महाकाली नगर प्रदक्षिणा शोभायात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग लाभला या सहकार्या मुळेच आपण सहा किलोमीटर लांबीची ऐतिहासिक अशी शोभायात्रा काढू शकलो. या वर्षीही हे आयोजन आपल्याला याच भव्यतेसह करायचे असुन विवेक नगर येथील श्री. राम मंदिर कमेटीनेही यंदाच्या महाकाली महोत्सवात सहभागी व्हावे अशी विनंती यावेळ बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
आज सर्वत्र मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी केल्या जात आहे. विविध ठिकाणी यासाठी कार्यक्रम आयोजीत आहे. ही भव्यता दरवर्षी अशीच कायम असली पाहिजे. पुन्हा एकदा रामराज्य निमार्ण करण्यासाठी आपल्यातील दुर्गुणांचा त्याग करत समाजाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असले पाहिजे असेही यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.