पाण्यासाठी कोठारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा धडकला

0
551

पाण्यासाठी कोठारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा धडकला

 

कोठारी– वंचित बहुजन आघाडी कडून जिल्हा महासचिव धीरज बांबोडे व ग्राम पंचायत सदस्य अमोल कातकर यांचे नेतृत्वात नालयोजना त्वरित सुरू करण्याकरिता ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला.यात गावातील शेकडो महिला,पुरुषांनी सहभाग घेऊन निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करीत बल्लारपूर नायब तहसीलदार साळवे ,कोठारीचे ठाणेदार तुषार चौव्हान व सरपंच मोरेश्वर लोहे यांना निवेदन देत येत्या दहा दिवसांत पाणी सुरू करण्याची मागणी केली तसे न झाल्यास १० मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
कोठारीत पाण्याची भीषण समस्या मागील पंधरा वर्षांपासून सुरू असून गावकरी त्रस्त आहेत.खनिज विकास निधी अंतर्गत नळ योजनेसाठी साडेतीन कोटी मंजूर करून त्याचे बांधकाम पूर्ण झाले व योजना चार वर्षांपूर्वी ग्राम पंचायतीला हस्तांतरित करण्यात आली.मात्र तेव्हापासूनच नळाचे थेंभर पाणी गावकर्यांना मिळाले नाही.ग्राम पंचायत प्रशासन उंटावरून शेळ्या राखण करीत अनेक तृट्या असल्याचे कारण पुढे करीत गावकऱ्यांची बोळवण करीत आहे. ग्राम प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून वंचित बहुजन आघाडी कडून आज सोमवारला घागर मोर्चाचे आयोजन करीत महिलांनी ग्राम पंचायत आवारात घागरी फोडून निषेध नोंदवला व प्रशासनाच्या चेतना जागवित नाळयोजना त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली.पाणी दो वर्णा खुर्ची खाली करो. पाणी द्या पाणी द्या घरी पाणी द्या. ग्राम पंचायत प्रशासनाचा निषेध असो. अशा घोषणा देत मोर्चा ग्रामपंचायतीवर धडकला.यावेळी पोलीस तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.यावेळी धीरज बांबोडे यांनी मोर्चाला संबोधित करीत कोठारीतील राजकीय नेते व ग्राम पंचायत यांचे ढिसाळ कारभारामुळे गावाचे व गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.गावात अनेक नागरी समस्या मागील पाच वर्षात निर्मान झाल्या आहेत. गावातील रस्ते,नाल्या,पाणी,दिवाबत्ती व अस्वच्छता यामुळे गावकरी त्रस्त असून ग्राम पंचायत प्रशासनावर व पदाधिकार्यावर नाराजी उमटत असल्याचे सांगितले.
मागणीचे निवेदन बल्लारपूर नायब तहसीलदार साळवे, ठाणेदार चव्हाण,सरपंच मोरेश्वर लोहे,ग्राम विकास अधिकारी अभय धवने यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here