अबब! चक्क दारूच्या बाटल्यानी नाली तुंबली…!!!

0
1072

अबब! चक्क दारूच्या बाटल्यानी नाली तुंबली…!!!

राजुरा नाका नं ३ येथील प्रकार, अखेर नाली फोडून काढल्या बाटल्या

राजुरा, अमोल राऊत : राजुरा शहरातील नाका नं. ३ हा चौक नेहमी गजबलेला असतो. याठिकाणी नेहमी लोकांची वर्दळ असते. राजुरा ते आदीलाबादला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील हे महत्वाचे ठिकाण. महत्वाचे म्हणजे दारूच्या बाटल्यांनी येथील गटाराचे चेंबर पूर्णतः तुंबून सांडपाणी वाहण्यास अडचण निर्माण झाली. अखेर नालीचे बांधकाम फोडून सफाई कामगारांनी साफ केली. दारू बंदी असतानाही कोणत्या मार्गाने अवैध दारू शहरात येते याची कल्पना न केलेलीच बरी!
या घटनेमुळे शहरात व तालुक्यात मोठया प्रमाणात अवैध दारू विक्रीचा व्यवसायाने बरेच हातपाय पसरल्याची व शासन-प्रशासनाकडून याला हिरवी झेंडी मिळत असल्याची पोच पावतीच समजावी लागेल.
पोलीस प्रशासनाचा दारूबंदी अमलबजावणीतील ढिसाळपणा व नगर परिषद प्रशासनाकडून नाली सफाईस दिरंगाई करून जनतेच्या आरोग्याशी मांडलेला खेळ यामुळे चव्हाट्यावर आला आहे. दारू माफियांना वेळीच आवर घालून होणाऱ्या नाहक त्रासातुन जनतेला मोकळीकता मिळेल का? हा प्रश्न ऐरणीवरच आहे.यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here