कपिलधरा स्मशान भुमीत विद्युत दाहिनीची व्यवस्था करा – सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारेंची मागणी

0
487

कपिलधरा स्मशान भुमीत विद्युत दाहिनीची व्यवस्था करा – सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारेंची मागणी

उस्मानाबाद, किरण घाटे : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अनेक संसर्ग रुग्ण दगावत असुन अंत्यविधी करणा-यांची तारांबळ होत आहे .त्यांच्या आरोग्याचाही आता प्रश्र्न निर्माण होण्याची शक्यता आहे,या श्मशान भुमीत केले जाणारे अंत्यविधी बाजुलाच असलेल्या लोकवस्ती नजिक हाेत असल्यामुळे दुर्गंधी पसरत अाहे

अंत्यविधी करणा-या कोरोना योध्द्यानाही कसरत करावी लागत आहे, दररोजच्या वाढत्या मृत्युदरामुळे येथे विद्युत दाहिनीची गरज असुन विद्युत दाहिनी जर उपलब्ध झाली तर वेळ,कसरत, लाकुड,प्रदुर्षण सारख्या बाबी ‌टाळता येतील, अंत्यविधी करणारे व आरोग्य विभागातील काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत असुन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत अशांच्या मानधनात वाढ करुन विमा सारख्या इतर बाबी त्यांना लागु केल्या पाहिजेत, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे शहरातील कपिलधरा श्मशान भुमीतच अंत्यविधी केले जातात यामुळे आजच्या परिस्थितीत येथे विद्युत दाहिनीची अत्यंत गरज आहे..या सर्व बाबींचा विचार करून येथे विद्युत दाहिनीची व्यवस्था करुन‌ अंत्यविधी करणा-या कोरोना योध्द्याचाही विचार करून न्याय द्यावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदनातुन सामाजिक कार्यकर्ता गणेश रानबा वाघमारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here