संयुक्त मोजणी केल्याशिवाय रेल्वेने कोणती कार्यवाही करू नये – ना. सुधीर मुनगंटीवार आणि तहसीलदारांचे रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र

0
70

संयुक्त मोजणी केल्याशिवाय रेल्वेने कोणती कार्यवाही करू नये – ना. सुधीर मुनगंटीवार आणि तहसीलदारांचे रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र

गणपती वार्डातील नागरिकांच्या हाकेला धावून आले सुधीर मुनगंटीवार

 

रेल्वे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी गणपती वार्डातील रेल्वेच्या हद्दीत आणि जवळच्या काही नागरिकांना दिनांक 15 मार्च रोजी पंधरा दिवसाच्या आत घर खाली करण्याचे नोटीस देण्यात आले. ज्यामध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेल्या रेल्वे हद्दीतील जागेवरील घरे,नजूलच्या जागेवरील घरे व पट्टे असलेल्या नागरिकांच्या घरांचा समावेश असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी नेहमी तत्परतेने सहकार्याला धावून जाणारे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.आशिष देवतळे यांच्याशी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रामध्ये संपर्क साधला त्यानंतर वेळ न गमावता दुसऱ्या दिवशी दिनांक 16 मार्च रोजी उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले तसेच ना. सुधीर मुनगंटीवार यांची दिनांक 19 मार्च रोजी चंद्रपूरला भेट घेऊन सविस्तरपणे विषय सांगण्यात आल्यानंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाऊंनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले व संयुक्त मोजणी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये असे पत्र काढून पुन्हा एकदा स्थानिक नागरिकांना मदतीचा हात दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here