भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा जय घोष करीत महामानवाला अभिवादन

0
611

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा जय घोष करीत महामानवाला अभिवादन

 

गोवरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनी सोमवारी सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आले. गावाच्या मुख्यमार्गांवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी भीम ज्योत रॅली सुद्धा काढण्यात आली.
यावेळी सुनिल उरकुडे सभापती कृषी आणि पशु संवर्धन जिप चंद्रपूर, चेतण बोभाटे सदस्य ग्रामपंचायत गोवरी, सिद्धार्थ कास्वटे ग्रामपंचायत सदस्य गोवरी, प्रा. दिनेश घागरगुंडे अध्यक्ष संबुद्ध पंचशील मंडळ, उपाध्यक्ष विश्वनाथ करमनकर, सचिव प्रा. मुनघाटे सर, आयु. अनिता कास्वटे अध्यक्ष रमाई महिला मंडळ, उपाध्यक्ष मनीषा कास्वटे, सचिव कल्पना घागरगुंडे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, स्वच्छता समितीचे सर्व सदस्य, सर्व उपासक, सर्व उपासिका तसेच युवा वर्ग यांची कार्यक्रमाला मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here