ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे महाकरिअर व व्यवसाय मार्गदर्शन सभा

0
348

ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे महाकरिअर व व्यवसाय मार्गदर्शन सभा

तालुका प्रतिनिधी
चिमूर

दिनांक 21जानेवारी 2021 रोज गुरुवारला ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे महाकरिअर व्यवसाय मार्गदर्शन सभा आयोजित केलेली होती .या सभेचे अध्यक्ष सदाशिव मेश्राम प्राचार्य ,प्रमुख मार्गदर्शक मा. संजय पंधरे सर (साधन व्यक्ती पं. स. चिमूर,),मा. यशवंत सोनवाणे सर (साधन व्यक्ती)पं. स. चिमूर हे होते.
संजय पंधरे यांनी महाकरिअर बाबत विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली व रोजगार व व्यवसायाचे अनेक मार्ग आहेत ते आपण निवडावेत व त्या प्रमाणे आपण अभ्यासाची तयारी करावी असे विद्यार्थ्यांना सांगितले .सोनवाणे यांनी महाकरिअर पोर्टल वरील माहिती आपण कशी शोधायची त्या संबंधाने विस्तृत माहिती सांगितली.
प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी आपल्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी महाकरिअर पोर्टलचा वापर करून आपले भविष्यातील नोकरी व व्यवसायातील पर्याय विद्यार्थ्यांनी निवडून आपले आयुष्य घडवावे व आपल्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा नाव लौकिक करावा .आपल्याला शैक्षणिक बाबी मध्ये ज्या अडचणी येतील त्या आम्ही विद्यालयाच्या वतीने पूर्ण करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले .
सभेचे संचालन सहायक शिक्षक शेरकी यांनी तर आभार प्रदर्शन श् मडावी यांनी मानले ।
सभेला सर्व शिक्षक, वर्ग 9व 10 वीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here