येत्या २४ तासात निर्णय घ्या अन्यथा तीव्र अंदोलन करू – नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी

0
519

येत्या २४ तासात निर्णय घ्या अन्यथा तीव्र अंदोलन करू – नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी । हातावर पोट असलेला नाभिक समाज कोरोनामुळे पूर्णतः आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाच्या कडक निर्बंधामुळे त्याचा प्राण गुदमरायला लागला आहे. वर्षभर दुकानाला असलेल्या निर्बंधामुळे ग्राहक आधीच कमी झालेत. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर हा समाज पूर्णतः हवालदिल झाला आहे. त्यामुळे आज ब्रम्हपुरी नाभिक युवा आघाडी तर्फे तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आला.
आर्थिक समस्यांना कंटाळून मागील लॉक डाऊन काळात १५ ते १६ नाभिकबांधवांनी आत्महत्तेसारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवन यात्रा संपविली आहे. सरकार कडे नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी व संपूर्ण राज्यातून वारंवार आर्थिक मदतीचे निवेदने घेऊन ही आतापर्यंत त्यांची कसलीही दखल घेतली नाही, आता तरी सरकारने पाठीवर मारावे, पण पोटावरून मारू नये अशी मागणी नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे करण्यात आली.
नाभिक समाज हा अंशत:पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असून भूमिहीन व आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे, सलून दुकानदारावर त्याचा एकाचीच नाही तर अख्या कुटुंबाची जवाबदारी असते. शासनाच्या या अविवेकशील निर्णया मुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाना भुकमारीची पाळी येणार आहे. दुकानाचा किराया, लाईटबील, बँकेचे हफ्ते,घरभाडे, आरोग्याचा खर्च, कुटुंबाचे दैनंदिन खर्च त्यांनी कसे भागवायचे? पोट कसे भरायचे? या बाबत सरकारने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या समाजाकडे मानवी भूमिकेतून बगुन सरकारने विचार करावे.यावेळी अध्यक्ष विलास सूर्यवंशी, मार्गदर्शक अजय खळ शिंगे,सचिव लक्ष्मीकांत फुलबांधे विलास दाणे, पितांबर फुलबांधे, श्रावण येळणे, विनोद मेश्राम, निखिल मोहडेकर, गणेश मेंधुलकर,रज्जू खळशिंगे,रमा मेश्राम व इतर समाज बांधव उवस्थित होते.
येत्या २४तासात शासनाने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्तावर उतरू असा तीव्र इशारा नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here