दि.चंद्रपुर जिल्हा मध्य.सह.बँक म्हणजे “आपली बँक” :- पांडुरंगजी जाधव

0
497

दि.चंद्रपुर जिल्हा मध्य.सह.बँक म्हणजे “आपली बँक” :- पांडुरंगजी जाधव

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

बँकेच्या एकशे नऊ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत शेतकरीवर्गाचे खुप मोठे योगदान आहे .
शेतकर्‍यांची बँक म्हणुन बँकेने शेतक‍र्‍यांच्या प्रत्येक सुख दुख:त सहभागी होऊन नेहमी
शेतकरी हिताचे धोरण आखले आहे . मुलीचे विवाह कर्ज योजना, शेतकरी कल्याण निधितुन शेतकर्‍यांना मदत करणे असो किंवा
तार कुंपण कर्ज, ट्रँक्टर कर्ज, गोदाम कर्ज, कुकुट पालन ,दुभती जनावरे डॆअरी फ़ार्म असे शेतकरी उपयोगी धोरण
आखुन नेहमी शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर पणे बँक उभी आहे.
दि.चंद्रपुर जिल्हा मध्य.सह.बँक म्हणजे “आपली बँक” आहे आपले हित जोपासनारी बँक आहे “विचार तुमचा मदत आमची” असा विश्वास उपस्थितांना मेळावा प्रसंगी
मा.पांडुरंगजी जाधव संचालक च.जि.म.स. यांनी दिला .
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक शाखा गडचांदुर येथे आयोजीत शेतीपुरक मध्यम व दिर्घ मुदती
कर्ज धोरण प्रचार व प्रसार मेळावा प्रसंगी मा.पांडुरंगजी जाधव संचालक च.जि.म.स. व मा. शामरावजी कोटनाके (अध्यक्ष भेंडवी आदी. संस्था,)
मा. रामदासजी आत्राम (अध्यक्ष हरदोना आदी. संस्था) मा. डि.जे काँलर (शाखा व्यवस्थापक ) व श्री.प्रशांत आर. बलकी (शाखा निरिक्षक )मा. सुभाशजी एकरे (सचिव गड.आदी संस्था) बहुसंखेने शेतकरी वर्ग व बचत गट महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here