गोंडपिपरित आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू

0
408
*गोंडपिपरीत आधारभूत धान खरेदी केंद्राचे लोकार्पण*
धान खरेदी केंद्र गोंडपिपरी तालुक्यातील शेतकर्‍यांना हितकारक.
                  — आमदार सुभाष धोटे
वढोली(वार्ताहर)
 दि १० डिसेंबर गुरुवारला  गोंडपिपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी येथे आधारभूत धानखरेदी केंद्राचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. दि महाराष्ट्र को- आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड चंद्रपूर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी येथे हे केंद्र सुरू केले आहे. ठोकळ व बारीक असे दोन्ही प्रकारचे धान या केंद्रामध्ये खरेदी केले जाणार आहे. या साठी आॅनलाईन नोंदणी करण्याकरिता गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२०-२१ ला भात पिकाची पेरा नोंदणी असलेला सातबारा आधारकार्ड व बँकेची लिंक असलेला आयएफएससी कोडच्या पासबुकची झेरॉक्स बाजार समिती येथे आॅनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आपण शासनाकडे पाठपुरावा करून हे केंद्र मंजूर केले असून हे केंद्र तालुक्यातील शेतकर्‍यांना हितकारक ठरणार आहे असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
            या प्रसंगी सुरेशराव चौधरी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,सपना साखलवार नगराध्यक्षा नगरपंचायत, तुकाराम झाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, अशोक रेचनकर , प्रा. संभुजी येलेकर, विनोद नागापूरे अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, राजु चंदेल माजी अध्यक्ष, संतोष बंडावार , के.डी. मेश्राम तहसिलदार, देवेंद्र बट्टे , प्रविण नरहरशेट्टीवार, प्रदिप झाडे, साईनाथ कोडापे, नामदेव सांगळे, गौतम झाडे,सचिन फुलझले, देविदास सातपूते, आशिर्वाद पिपरे, संजय झाडे, बाळाजी चनकापूरे, आनंद कुंदोजवार, रामचंद्र कुरवटकर, रफीक भाई,गौतम झाडे,अनिल झाडे,संदिप लाटकर,प्रशांत ताकसंडे, अभय शेंडे, वनिता वाघाडे, अनिल कोरडे, अजय बोटरे ,मनोज नागापुरे,विलास कोहपरे व मोठ्या संख्येनी शेतकरी बांधव उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here