येणार्‍या काळात 1 करोड लोकांना धम्मदिक्षा देणार – डॉ. भिमराव य. आंबेडकर

0
447

येणार्‍या काळात 1 करोड लोकांना धम्मदिक्षा देणार – डॉ. भिमराव य. आंबेडकर
चंद्रपूर येथील दिक्षाभूमीवर केले जाहिर
चंद्रपूर(का.प्र.)-बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली नागपूर नंतर चंद्रपूर येेथे धम्मदिक्षा दिली आणि त्यामुळे चंद्रपूरची दिक्षाभूमी सुध्दा तेवढीच महत्वाची ठरते. चंद्रपूरच्या दिक्षाभूमीवरर मला बोलावल्यामुळे मी चंद्रपूर जिल्हा शाखेचे आभार मानतो असे उद्गार भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.डॉ.भिमराव आंबेडकर यानी चंद्रपूर येथील  दिक्षाभूमीवर आयोजीत धम्म परिषद तथा धम्म दिक्षा सोहळयादरम्यान काढले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बोध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष मा. नेताजी भरणे हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून मा.अरुण घोटेकर, अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमो. सोसा. चंद्रपूर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. जगदीश गवई-जयसेन बौध्द राष्ट्रीय महासचिव शंकरराव ढेंगरे राष्ट्रीय संघटक एम.डी. सरोदे, राष्ट्रीय सचिव मा. वसंत पराड मा.  बि.एम.कांबळे उपस्थित होते पुढे बोलतांना ते म्हणाले की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली प्रतिष्ठा पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी जिवाचे रान करणे गरजेचे आहे. धम्म परिषदा आणि धम्म दिक्षा सोहळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात पार पडत आहेत. इतर समुहातील लोक बौध्द धम्म दिक्षा घेवून बौध्द होत आहेत आणि त्यामुळे आपली सुध्दा जबाबदारी वाढलेली आहे. येणार्‍या काळात भारतीय बौध्द महासभेतर्फे 1 करोड लोकांनी दिक्षीत करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरात याच प्रकारचे दरवर्षी मेळावे झाले पाहिजेत व त्युन बौध्द धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे व विज्ञानवादी बौध्द धम्म आपण सर्वांनी अंगिकारता पाहिजे असेही ते म्हणाले.
भारतीय बौध्द महासभा जिल्हा चंद्रपूर तर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. दि. 10 फेबु्रवारी 2023 पासून 19 फेबु्रवारी 2023 पर्यंत श्रामनेर शिबिर ओयाजीत करण्यात आलेले होते. या शिरिात एकुण 37 धम्म उपासकांनी प्रवेश घेवून 10 दिवस श्रामनेर शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून भन्ते सुमेधबोधी चैत्यभूमी मुंबई व मा. ज्ञानोबा कांबळे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक मुंबई हे हेाते. चंद्रपूर जिल्हयातील विविध बुध्द विहारांमध्ये धम्म उपासिकी शिबिर राबविण्यातय आली. दि. 10 फेबु्रवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत विविध केंद्रांनी शिक्षिकांनी मार्गदर्शन केले. दि. 18 व 19 फेबु्रवारी रोजी समता सैनिक दलाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून लेफ्टनंट कर्नल अशोक पेरकावर, मेजर प्रफुल भगत हे होते. संचालन जिल्हा सरचिटणीस मा. अ‍ॅड. जगदीप खोब्रागडे, प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष मा.संदिप सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन मा. सपनाताई कुंभारे  यांनी केले.देवेंद मेश्राम, भिमराव फुसे, राजपाल खोब्रागडे, देवानंद वानखेडे प्रफुल भगत, सुजाता लाटकर कार्यक्रमाला जवळपास 5 हजार लोकांची उपस्थिती होती. भिमलाल साव, नादेव, आवळे, डॉ. विनोद फुलझेले, विशाल कवाडे, भाऊराव दुर्योधन, संकेत जयकर, जी.एस.फुलझेले, प्रकाश तावाडे, दिगांबर दुर्योधन, अरविंद पेटकर,मिलीताई वाघ, सुनिता कांबळे, प्रगती मेश्राम, समता लभाने इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here