संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना आप चे अभिवादन

0
481

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना आप चे अभिवादन

चंद्रपूर : तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती निमीत्त आम आदमी आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा महानगर कडून अभिवादन करण्यात आले .

या वेळी आप चे राजेश चेडगुलवार यांनी संताजी महाराज यांचा बद्दल माहिती देत सांगितले की संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही ब्राह्मणांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले. या वेळी आप जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे , सचिव राजू कुडे, दिलीप तेलंग, सुजित चेडगुलवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here