पाण्याचे पंप लावल्यामुळे मिळेना पाणी

0
472

पाण्याचे पंप लावल्यामुळे मिळेना पाणी

राजुरा, विर पुणेकर : राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर वसलेल्या माणोली बूज ग्रामपंचायतमधील सुमारे २५० कुटुंबांच्या लोकवस्तीचे बाबापूर हे गाव. या गावात पाणीटंचाईची समस्या आता उग्र बनली असून
गावातील काही नागरिक नळ योजनेने दिलेल्या नळाला पाणी पंप (टीलू पंप) जोडून पाणी घेत आहेत.
त्यामुळे जलकुंभा तील पाण्याची धाव त्या लावलेल्या पंपा कडे होत असल्याने गावातील इतर नागरीकांना पाण्याचा तुटवडा भासत आहे. तरी ही ग्रामपंचायत माणोली बूज यांचे या गंभीर प्रकणावरती दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
गावातील नागरिकांनी त्या पंप धारकांना वारंवार चेतावणी देऊन देखील त्यांच्यात काडीमात्र बदल पडला नाही. यामुळे बाबापूर गावमध्ये पंप जोडणी केलेल्या व्यक्तींबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे.
तसेच गावकरी यांची ग्रामपंचायतिला त्या पंप धारकांनचे नळ जोडणी खंडित करावी आणि त्यांना दंड आकारावा. सोबतच त्यांचे पंप जप्ती करावे अशी मागणी बाबापूर गावकरी वासीयांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here