शेतकऱ्यांसाठी गोडावून रिकामे करून उन्हाळी धान खरेदी सुरू करा – आमदार डॉ. देवरावजी होळी

0
467

शेतकऱ्यांसाठी गोडावून रिकामे करून उन्हाळी धान खरेदी सुरू करा – आमदार डॉ. देवरावजी होळी

उन्हाळी फसलीचे धान खरेदी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान २ धान खरेदी केंद्र सुरू करा

जिल्ह्यातील असंख्य शेतकरी उन्हाळी धान विक्री च्या प्रतीक्षेत

गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले आहे मात्र गोडावून पुर्ण भरले असल्याचे सांगून अद्यापही उन्हाळी धान खरेदी सुरू केली नाही त्यामुळे शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने तातडीने गोडाऊन मधील धानाची उचल करून गोडाऊन रिकामे करावे व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान २ धान खरेदी केंद्र सुरू करून उन्हाळी धानाची खरेदी सूरू करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.
आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा फेडरेशनच्या वतीने दरवर्षी उन्हाळी धानाची खरेदी केल्या जाते मात्र यावर्षी अजूनपर्यंत उन्हाळी धान खरेदी सुरू न केल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत सापडलेला आहे. त्यातच वातावरण साथ देत नसल्याने आपले धान खराब होईल की काय अशा चिंतेमध्ये शेतकरी सापडलेला आहे. जिल्ह्याचे प्रशासन धान गोडाऊन भरलेले असल्यामुळे अजून पर्यंत उन्हाळी धानाची खरेदी सुरू केलेली नाही असे कारण सांगत आहे. परंतु है योग्य नाही. शासनाने तातडीने भरलेल्या गोडाऊन मधील धान्याची उचल करून त्याची भरडाई करावी व उन्हाळी फसली साठी धान्य गोडाऊन रिकामे करावे. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान २ धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या धानाची तातडीने खरेदी सुरू करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here