पोंभुर्णा चा आवाज मुंबईत पोहोचवू ..

0
496

पोंभुर्णा चा आवाज मुंबईत पोहोचवू ..

शिवसेना नेते प्रशांत दादा कदम यांची पोंभुर्णातून हुंकार

येणार्या स्थनिक स्वराज्य संस्थेतेच्या निवडणूका ताकदनिशा लढल्या जाईल

तालुका प्रतिनिधी

पोंभुर्णा तालुक्याला व शहराला राजधानी मुंबईत पोहोचवु व खऱ्या अर्थाने पोंभूर्णा शहराचा पर्यायाने तालुक्याचा विकास करू व सामान्य गोरगरीब जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊ असे प्रतिपादन शिवसेना नेते व चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम यांनी आज येथे केले.
ते आज पोंभुर्णा शिवसेना मेळाव्यात कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना हे आवाहन केले. पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रम लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रशांत दादा कदम यांनी शहरवासीयांना पोंभूर्णा नगरपंचायत ही शिवसेनेच्या भगव्याची असेल, हे करण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने जोमाने कामाला लागावे असे आव्हान दिले. पोंभुर्णा येथे युवासेना प्रमुख,पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांची भव्य दिव्य सभा घेऊ असे आव्हान आज दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे,यांनी निवडणूक कोणती असो ते ताकदीनीशी लढल्या जाईल असा कार्यकर्ताना तयारीला लागा असे आव्हान केले. यावेळी प्रमुख उपस्थीत उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार,तालुका प्रमुख विनोद चांदेकर शहर प्रमुख गणेश वासलवार,मुल तालुका प्रमुख नितीन येरोजवार,युवासेना समन्वयक निलेश बेलखडे,उपतालुका प्रमुख रविंद्र ठेंगणे,द्त्तू मोरे,जिवनदास गेडाम,विजय वासेकर,महिला आघाडीचे कांताताई मेश्राम,सुनिताताई वाकूडकर,सुनिताताई गोरंतवार,व आदि मान्यवर उपस्थीत होते, या कार्यकमाचे संचालन जिवनदास गेडाम तर प्रस्ताविक आशिष कावटवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here