नेफडो राजुरा शाखेतर्फे दिव्यांग क्रीडा प्रशिक्षक महेमूद शेख यांना धान्य ,किराणा कीट सह कपड़े व खाऊ भेट.
– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा अभिनव उपक्रम.
राजुरा 27 ऑक्टोबर

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांच्या मार्गदर्शनात राजुरा येथील दिव्यांग क्रीडा प्रशिक्षक महेमूद जब्बार शेख यांना धान्य ,किराणा सामान कीट व कपड़े भेट देण्यात आले. अत्यंत गरीब आणि डोळ्यांनी अंध असूनही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा अक्यदमी स्थापन करून मुला -मुलींना अथ्यलेटिक्स प्रकारातील धावनी या खेळाचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थी घडविणाऱ्या शेख यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे हे सर्व साहित्य मोफत भेट देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक विजय जांभूळकर, तालुका अध्यक्ष अल्का सदावर्ते , संतोष देरकर , उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते , रजनी शर्मा , सचिव सुजीत पोलेवार , अँड. मेघा धोटे, तालुका संघटक राजश्री उपगण्लावार ,सूनैना तांबेकर , आशीष करमरकर , संतोष वडस्कर, शहर अध्यक्ष संदीप आदे, शहर संघटक उमेश लढी, रवी बुटले , सहायक शिक्षक गेडाम आदिंचि उपस्थिती होती.
डोळ्यांनी अंध असूनही विद्यार्थ्यांना क्रीडा विषयी आवड निर्माण करून विनाशुल्क क्रीडा प्रशिक्षण देण्याचे कार्य दिव्यांग असलेले शेख करीत आहेत. त्याचे मार्गदर्शनात विद्यार्थी राज्य स्तर, राष्ट्रीय स्तर पर्यंत खेळलेले आहेत. घरची अत्यन्त गरीब परिस्थिती,त्यातही अंध असूनही क्रीडा अकाडमी सुरु करून विद्यार्थी घडवीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत नेफडो तर्फे ही मदत करण्यात आली आहे. 2016-2020 पर्यंत शेख यांच्या मार्गदर्शनातील तीन मुली पोलीस , एक वनवीभाग तर दोन मुले सैनिक म्हणून नोकरीला सुधा लागले आहेत. नेफडो तर्फे पर्यावरण संवर्धन सोबतच मानवता वीकासाच्या बाबतीतही अनेक उपक्रम राबविल्या जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेमार्फत सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रम घेतले जातात. राजुरा तालुक्यातही या संस्थेने पुढाकार घेत आपले सामाजिक भान जोपासत निसर्गाच्या समतोलावरही भर दिला आहे. विशेष सहकार्य आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता सातवींतिल विध्यार्थी क्रिष्णा बुर्हान , तन्मय भोयर ,आदित्य हरिहर ,वैभव चव्हाण यांनी डाळ आणि तांदूळ दिले.