चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस, महादेव कन्नाके नंतर आता पाथरीचा पाेलिस शिपाई उमेश पाेटावी एसीबीच्या जाळ्यात अडकला

0
555

चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस, महादेव कन्नाके नंतर आता पाथरीचा पाेलिस शिपाई उमेश पाेटावी एसीबीच्या जाळ्यात अडकला

चंद्रपूर, किरण घाटे वि. प्र.
लाच घेणे व देणे हा कायद्याने जरी गुन्हा असला तरी लाच घेण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याचे एकंदरीत दिसून येते .अश्यातच काल बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी पाेलिस स्टेशनचा एक पाेलिस शिपायी तब्बल १५ हजार रुपयांची लाच घेतांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अलगद अडकला. या शिपायाचे नांव उमेश पाेटावी असे असुन सट्टापट्टी लावत असतांना एका व्यक्तिस त्याने या पूर्वी पकडले हाेते. त्या वेळी काही रक्कमेची मागणी करुन त्यास साेडुन दिले हाेते परंतु नंतर त्या व्यक्तिस वारंवार पाेलिस शिपाई हा रक्कमेची मागणी करीत हाेता शेवटी काल १५हजार रुपयांची लाच घेतांना या लाचखाेर पाेलिस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने यशस्वीरित्या सापळा रचुन रंगेहात पकडले. या आधी (एक एफ्रिलला) चंद्रपूर येथील एसीबीच्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी महसूल विभागातील नंदाेरीचा बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैसला भद्रावती तहसील कार्यालयात दीड हजार रुपयांची एका शेतक-याकडुन (शेत जमिन फेरफार प्रकरणात) फेरफार प्रमाणित करण्यांसाठी लाच घेतांना रंगेहात पकडले हाेते तर दुस-या एका फेरफार प्रकरणात (फेरफार रूजूवात करण्यासाठी )बेंबाळ मंडळाचा मंडळ अधिकारी महादेव कन्नाके यास तहसील कार्यालय बाहेरच्या परिसरातील एका चहा टपरीवर मूल तालुक्यातील भेजगांव येथील एका राजकीय नेत्याकडुन तीन हजार रुपयांची लाच घेतांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.२१जूनला रंगेहात पकडले हाेते. दरम्यान या प्रकरणातील बैस यांना जिल्हा प्रशासनाने निलंबित केले असून मंडळ अधिकारी कन्नाके यांचेवर लवकरच निलंबनाची कारवाई हाेत असल्याचे विश्वासनिय व्रूत्त आहे .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या सर्व कारवायांचे अनेकांनी स्वागत केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here