राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रीय विराेध दिनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

0
731

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रीय विराेध दिनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
अनेक कर्मचा-यांनी नाेंदविला आपला सहभाग
चंद्रपूर (विदर्भ), किरण घाटे वि.प्र.
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूरच्या वतीने आज गुरुवार दिनांक१५ जुलैला स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने देवून राष्ट्रीय विरोध दिन पाळण्यात आला.

कोरोना महामारीच्या दोन लाटा आल्या असून या महामारीच्या संकटाचे निराकरण धैर्याने करण्याचे शैर्य प्रत्येक राज्यातील आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी केले आहे. अशा या कर्तव्यनिष्ठ कामगार-कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच करणारे कायदे सध्या मंजूर केले जात आहेत. सरकारी क्षेत्रातील आस्थापनांचे अविवेकी खाजगीकरण केले जात आहे. त्याअनुषंगाने उपरोक्त बाबीस विरोध दर्शविण्यासाठी या निदर्शने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्मचारी संख्याबळाचा अविचारी संकोच केला जात आहे, प्रत्येक राज्यातील लाखो कर्मचारी रिक्त पदे भरली जात नाहीत, सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेले अनुज्ञेय आर्थिक लाभ देणे, सेवा क्षेत्राचे मजबुतीकरण करण्यासाठी पुरेसे कायम स्वरुपी मनुष्यबळ निर्माण करणे, कोरोना संक्रमणामुळे मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी तसेच अनुज्ञेय आर्थिक लाभ तात्काळ देण्यात यावे, पेट्रोल डिझेल इंधन तेलाच्या किमती कमी करणे, सर्वांचे मोफत लसीकरण तात्काळ करण्यात यावे अशा स्वरुपाच्या विविध मागण्या दिर्घकाळ प्रलंबित आहेत. तेव्हा या प्रलंबित मागण्यांस अनुसरुन याप्रसंगी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर चे अध्यक्ष दिपक जेऊरकर व जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ चंद्रपूर चे अध्यक्ष शालीक माऊलीकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन राजु धांडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार संदीप गाणफाडे यांनी मानले.

या निदर्शने कार्यक्रमास महसुल विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, भुमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भुविज्ञान-खनिकर्म विभाग, हिवताप कर्मचारी, आरोग्य विभाग आदी विभागाचे कर्मचारी तसेच दिपक जेऊरकर, शालीक माऊलीकर, राजु धांडे, अतुल भिसे, राजेश पचारे, रविंद्र आमवार, श्रीकांत येवले, अनंत गहुकर, अविनाश बोरगमवार, अमोल आखाडे, राजेश लक्कावार, प्रितम शुक्ला, संदीप गणफाडे, सिमा पॉल, रजनी आनंदे, प्रविण अदेंकीवार आदींनी व त्याच साेबत विविध कार्यालयीन संघटनांनी या निदर्शने कार्यक्रमात आपला सहभाग नाेंदविला होता. आजच्या निदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले हाेते, हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here