पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी – आदित्य वासनिक
उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

तालुका प्रतिनिधी
चिमूर
तालुक्यातील अनेक गावांत अजूनही पोलीस पाटलांचे पदे रिक्त आहेत. ती पदे तात्काळ भरण्यात यावी याबाबद्द नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
पोलीसांप्रमाणे ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर आहे. पोलीस पाटील हे पद महसूल व पोलीस प्रशासनाचे कान-नाक-डोळे म्हणून ग्रामीण भागात काम करते. परंतु सध्या गावातील या महत्त्वाच्या पदालाच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रहण लागले आहे. आजच्या घडीला राज्यात पोलीस पाटलांचे अनेक पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील हे पद ग्रामीण भागात महत्वाचे असून, गावात छोटे मोठे तंटे झाले, कोणते चोरीचे प्रकरण असले, किंवा गावात एखादी अनुचित घटना घडली तर पोलीस पाटलांच महत्वाचं काम असते. पोलीस पाटीलमूळ पोलिसांचे अनेक कामे सुरळीत होत असून, गावातील कोणत्याही गुन्ह्याचा लवकर तपास लावण्यासाठी पोलीस पाटील महत्वाचा दुवा ठरल्या जातोय. याकरिता राज्यातील व तालुक्यातील अनेक गावांत पोलीस पाटीलचे पदे रिक्त आहेत ते पदे लवकरात लवकर तात्काळ भरण्यात यावी.
याकरिता उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार चिमूर यांना नुकतेच शिवापूर (बंदर) चे उपसरपंच आदित्य वासनिक यांनी निवेदन दिले. निवेदन देतांना आशिष जीवतोडे, जीवन तराळे, मिथुन सोगलकर, निलेश नन्नावरे आदी उपस्थित होते.