खडसंगी येथे थ्रेशर मशीनच्या पट्ट्यात लुगड्याचा पदर अटकून महिलेचा मृत्यू
शेतात चणा, तूर काढत असतानाची घटना
तालुका प्रतिनिधी : आशिष गजभिये
चिमूर । सद्या शेतात तूर, चना आदी शेतातील पिकं निघाली असल्यामुळं अनेक नागरिक शेतातील पिकं काढण्यात व्यस्त आहेत.
खडसंगी येथे असेच शेतात थ्रेशर मशीनच्या साहाय्याने तूर, चणा पिकं काढत असताना चिंधाबाई वसंत तराळे या महिलेचा अचानक लुगड्याचा पदर थ्रेशर मशीनच्या पट्ट्यात अटकून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना खडसंगी येथे घडली.
सविस्तर वृत्र असे कि, चिंधाबाई वसंताजी तराळे अंदाजे (वय 60 वर्ष) ही महिला आणि घरातील सर्व मंडळी आपल्याच शेतातील कापलेले तूर, चणा पिकं काढण्यासाठी सकाळीच गेले होते. चिंधाबाई तुरीच्या पेंड्या देत होती. मात्र अचानक महिलेचा पेड्यासोबत लुगड्याचा पदर थ्रेशर मशीनच्या पट्ट्यात अडकला तेव्हा काही कळायच्या आतच तो गळ्याभोवती घट्ट फास होऊन जागेवरच मृत्यू झाला होता. मात्र कुटूंबातील व्यक्तींना वाटले की, हि बेशुद्ध झाली असावी असे वाटल्याने, त्या महिलेला तात्काळ खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल कामडी यांनी चिंधाबाई वसंता तराळे या महिलेला तपासणी केले असता मृत घोषित केले. सदर महिलेचा त्याचक्षणी जागेवरच मृत्यू झाल्याचे दैनिक प्रतिनिधीला सांगितले. महिलेला दोन मुले असून खडसंगी मधील हि पहिलीच घटना असून खडसंगी व परिसरात महिलेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.