शुल्लक कारणांनी केली वडीलाची हत्या

0
457

एकुलत्या एक मुलाने केल्या वडिलांची हत्या
खुनाच्या घटनेने परिसरात दहशत.

प्रतिनिधी..प्रवीण मेश्राम
कोरपना- नविन वर्षाच्या सुरुवातीलाच तालुक्यातील गडचांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नांदगाव ( सुर्या) येथील मुलानेच जन्मदात्या बापाचा खुन केल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आणि हळहळ व्यक्त होत आहे.
गडचांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नांदगाव (सुर्या) येथील शेतकरी शंकर फोफरे वय (४५) वर्षे हे दि. ०२/०१/२०२१ रोज शनिवार ला तुर‌ कापणी सुरू असल्याने मुलगा राहुल शंकर फोफरे याच्या सोबत तुर कापणी करण्यासाठी शेतावर गेले असता दुपारी दीड वाजताच्या सुमारास बाप लेकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे मुलाचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात मुलाने बापाच्या डोक्यात वार केला गळा चिरून बापाचा खुन केला आणि काही अंतरावर फरफट ओढत नेले आणि कपाशीच्या शेतात टाकून दिले होते काही झालेच नाही अशा पद्धतीने तो बैलासाठी चारा आणण्यासाठी निघून गेला मृतकाची पत्नी कापूस विचणी करीत होती एवढा वेळ झाला तरी जेवणासाठी बोलावले नाही म्हणून तीने जावून बघितले असता तिथे जेवनाचा डबा अस्तावेस्त आणि रक्ताचे डाग आढळून आले आईने मुलाला विचारले असता त्यांनी शोधाशोध केली असता त्यांना शंकर फोफरे मृत अवस्थेत आढळला असता हंबरडा फोडल्यानंतर घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नाईक आणि गडचांदूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाल भारती आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असता त्याला ताब्यात घेवून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here