डॉ. बाबासाहेबांचे विचार हुकूमशाही राजवटी विरोधात लढण्याचे बळ देते : राजु रेड्डी

135

डॉ. बाबासाहेबांचे विचार हुकूमशाही राजवटी विरोधात लढण्याचे बळ देते : राजु रेड्डी

घुग्घूस : काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात आजघडीला देशापुढे संविधान टिकविणे हे सर्वात जास्त महत्वाचे असून देशाचे राज्यकर्ते हे मनुवादी मानसिकतेचे असून त्यांना मनु विचारसरणीचे राज्य निर्माण करायचे आहे. लोकतंत्र संपुष्टात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहे.

आता लोकशाहीचे रक्षण करणे संविधानाचा रक्षण करणे हे सर्व भारतीयांचा आद्य कर्तव्य असून बाबासाहेबांचे विचार हेच या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्याचे बळ देत आहे.

बाबासाहेबांच्या विचारावरच काँग्रेस नेते राहुल गांधी हे कसली ही भीती न बाळगता हुकूमशाही मानसिकतेच्या मोदी शासना विरोधात लढा देत आहेत. त्यांचा लढा व्यक्तीगत नसून ते देशवासियां करीता लढा देत आहे. लोकशाही रक्षणार्थ आपण सर्वांनी गांधी यांचे हात बळकट करावे असे आवाहन ही रेड्डी यांनी केले आहे.

advt