१ एप्रिल २०२२ पासून चंद्रपूर जिल्ह्यात ‘ऑनलाइन सभासद नोंदणी मोहीम २०२२’ ला सुरवात

0
1000

१ एप्रिल २०२२ पासून चंद्रपूर जिल्ह्यात ‘ऑनलाइन सभासद नोंदणी मोहीम २०२२’ ला सुरवात

 

चंद्रपूर/महाराष्ट्र : समाजातील सर्व वंचित घटकांचे प्रतिनिधित्व करणारा सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष जनतेने स्विकारला आहे. दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढत आहे. लोकसभा – विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भरघोस मतदान देऊन प्रस्थापितांनी झोप उडवली. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे हजारो उमेदवार विजयी झाले. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी १ एप्रिल २०२२ पासून चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाईन सभासद नोंदणी मोहीम गांभीर्याने राबवण्यात यावी.

 

स्थानिक पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी आपापल्या विभागात चौकात बॅनर लाऊन टेबल टाकून ऑनलाईन सभासद नोंदणी मोहीम राबवावी. तसेच विविध वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन लोकांना पक्षाबद्दल माहिती देऊन सभासद करून घ्यावे. सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी स्वतः सभासद असणे अनिवार्य आहे. सभासद नोंदणीच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकत वाढते शिवाय पक्ष चालवण्यासाठी लागणारा निधी सुद्धा उभारला जातो. त्यामुळे आपण सर्वांनी तातडीने आपल्या तालुक्याची, महानगरची, वॉर्ड शाखा, ग्राम शाखा यांनी बैठक बोलावून ऑनलाईन सभासद नोंदणी मोहीम राबवण्याबाबत नियोजन करावे आणि ठरलेल्या नियोजनाचा अहवाल जिल्हाध्यक्ष पर्यंत पाठवावा.

ऑनलाईन सभासद नोंदणीसाठी वेबसाईट लिंक www.vbabharat.org

https://join.vbabharat.org/

 

“वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, नगराध्यक्ष, ग्राम/वॉर्ड शाखाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना कळकळीचे आवाहन केले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here