सावित्रीबाई फुले जंयती चे.औचित्य साधून
धानोली च्या महिला स्मार्ट ग्राम पुरस्कायासाठी सरसावल्या
आवाळपुर : आज दी.३जानेवारी २०२१ रोज रविवारला धानोली येथे क्रांती ज्योती शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांची १९०वि जंयती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष धानोली चे प्रथम नागरिक श्री. मा. विजय ग रणदिवे सरपंच तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सूषमाताई च.किन्नाके, सौ.प्राचीताई आडे ग्रा.प.सदस्य,कु सुनीता ताई सूर अंगणवाडी सेविका,सौ. प्रेमीला ताई मडावी आशार्वकर ,सौ.कालीदां ताई किन्नाके गटप्रर्वतक ,सौ.सूनिता ताई किन्नाके मोबिलायझर, श्रीमती सिंदूबाई मडावी ,सौ.विमलबाई मडावी, रसीका मडावी, कांताबाई मडावी, कु शीतल मडावी, श्री.ज्योतीराव मंगाम श्री.चंद्रभान किन्नाके सर,रामदास जी मडावी, तसेच गावातील असंख्य महिला व पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी विजय रणदिवे यांनीअध्यक्षीय भाषणात बोलताना सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर बोलताना स्त्री हि अशी एक शक्ती आहे शिक्षणात ती सरस्वती आहे रनागंनात झाशीची रानी , ती अंबीका चंडिका, रनराघीनी आहे स्त्री. कोणत्याही श्रेत्रात कमी नाही सावित्रीबाई फुले नी हाल अपेष्टा सहन करून स्त्री शिक्षण देण्याची महान कार्य केले त्याच प्रमाणे त्यांच्या जंयती निमित्तानेआपन ही आपला गावा करीता स्मार्ट ग्रांम करण्यासाठी संकल्प करू व स्मार्ट ग्राम मध्ये अवल येण्या साठी एक जुठि कामकरू यावेळी सर्व महिला नी सावित्रीबाई फुले चा जय घोष करीत पूढे एक दीलाने काम करून सदर कार्यक्रमाचे संचलन सौ.कालीदां ताई किन्नाके यांनी केल तर, आभार प्रदर्शन कुमारी शीतल मडावी यांनी केले.
