बेकिंग न्युज।।। पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 10 ते 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान

0
595

बेकिंग न्युज।।।

पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 10 ते 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान

घटनास्थळी सि – 60 जवानांची शोधमोहीम जारी

सूखसागर झाडे :- आज दि. 21/05/2021 चे सकाळी 06.00 ते 07.00 वा. दरम्यान पोमके कोटमी हद्दीतील मौजा पैडी जंगल परिसरात गडचिरोली येथील C- 60 पार्टी व नक्सलवाद्यांमध्ये चकमक झाली असून, सदर चकमकीत 10 ते 12 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी 8 जणांचे मृत्यदेह जंगलातून ताब्यात घेतले असून घटनास्थळी C 60 पार्टी कडून शोधमोहीम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढुही शकतो असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

काही दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र गट्टा येथे ग्रेनाइट टाकून भ्याड हल्ला नक्षलवाद्यांनी घडविला होता. तो ग्रेनाइट न फुटल्याने कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडला नाही. नक्षलवादी हे चक्क पोलीस चौकी वर घातपात करण्याचा भ्याडहल्ले करण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलीस विभागाने सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नक्सल व पोलीस यांच्या चकमकी दिवसेंदिवस वाढतच आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here