ग्रामदैवत आई श्री सोमजाई देवस्थानच्या वतीने वाकी येथील दरवर्षी प्रमाणे पारंपारिक पद्धतीने विविध कार्यक्रम नवरात्री उत्सवात ग्रामस्थ तर्फे साजरा होणार

0
397

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

वाकी बु: ता.महाड, जि. रायगड येथे दरवर्षी प्रमाणे आई श्री. देवी सोमजाई देवस्थानच्या वतीने शनिवार दि. १७/१०/२० आईची घटस्थापना पासुन ते रविवार दसरा दि: २५/१०/२० विसर्जन पर्यंत आई सोमजाई चा नवरात्री उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. परंतु कोरोना चा पार्श्वभूमीवर सर्वीकडे भितीचे वातावरण असल्यामुळे आईचा उत्सव संपूर्ण ग्रामस्थ शासनाचे नियमाचे पालण करुन करणार आहे.

आई सोमजाई देवी, भैरीजोगेशवरी, जननी, पांगारकरीण, काळकाई, नामदाईकरीण अशी विविध पाशान ईतिहास काळीण मुर्ती येथे आहेत, नवरात्री उत्सवात संपुर्ण परिसर पाऊसामुळे हिरवे गार निसर्गसौंदर्य असतो, प्रवेशद्वारपासुन ते मंदिरा पर्यंत रोशनायी असते, मंदिरला छान सजवलेले असते, रांगोळी काढली जाते, आईंची मुर्ती सुंदर पद्धतिने सजवलेली व नटवलेली असते. त्या मुर्तींचे आकर्षक रुप तेजस्वी दिसुन येतात.

शनिवार दि: १७/१०/२० घटस्थापना पासुन दररोज विविध कार्यक्रम होणार आहे, ह्यात सकाळ व संध्याकाळ ९ दिवस महाआरती सह प्रतेक ग्रामस्थ मंडळा तर्फे हरिजागर, धनगरी नृत्य, भजन (बुवा श्री. संजय घाडगे, स्वरगंध युवा भजनी मंडळ देशमुख कांबळे) ह्यांचा होणार असुन त्यात कीर्तन, मग भक्तांसाठी दररोज दुपारी महाप्रसाद चा लाभ दिला जाणार आहे, दुर्गाअष्टमी च्या दिवशी होमहवन व दसरा च्या दिवशी मिरवणुक विसर्जन केला जाणार आहे.

ह्या उत्सवाला मुंबईहुन अनेक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित रहात असतात परंतु कोरोना चा पार्श्वभूमीवर यंदा मात्र कमी प्रमाणात दिसण्यात येतील. आईची ओढ भक्तांना येथे दरवर्षी प्रमाणे घेऊन येते. संपूर्ण ग्रामस्थ (ह्यात गावठण, शिवाजी नगर, नानेमाची आवाड, धनगरवाडी, शेवते, खरकवाडी, आंब्याचा माळ, शेंदुरमळई, पेडामकरवाडी, नांदुरुकवाडी, नारायणवाडी) ह्यांचा तर्फे हरिजागर चा कार्यक्रम ९ दिवस नवरात्री च्या दिवशी केला जातो. चाकरमणी आईची ओटी भरायला व दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित रहातात. नवसाला पावणारी आई देवी सोमजाई आपल्या भक्तांच्या नेहमीच पाठीशी असते.

ह्या कार्याला विशेष सहकार्य सोमजाई देवस्थान चे अध्यक्ष श्री. संजय गंगाराम कदम, उपाध्यक्ष श्री. प्रकाश दरेकर, सचिव श्री. श्रीरंग भोसले, खजिनदार श्री. अमोल जाधव सह देवस्थान चे अनेक मान्यवर विश्वस्त उपस्थित असतात. आईच्या दर्शनाला अनेक समाजाची माणसे आवर्जून येत असतात. अशा प्रकारे आई सोमजाई देवी चा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. अशी संपूर्ण माहिती श्री. महेश म्हामुणकर यांनी आम्हाला दिली आहे.

नवसाला पावणारी आई देवी श्री सोमजाई ह्या जगातुन कोरोना चा संकट लवकर नष्ट कर व तुझा आशिर्वाद ह्या जगाच्या सर्व विश्वावर असो हिच चरणी प्रार्थना करतो. सोमजाई देवी चा ऊदे ऊदे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here