चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या निष्क्रिय व बेजबाबदार वागणुकीने महाजनकोचे कोट्यावधीचे नुकसान…

0
950

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या निष्क्रिय व बेजबाबदार वागणुकीने महाजनकोचे कोट्यावधीचे नुकसान…

 

चंद्रपूर : वंचित बहुचन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या सहकार्याने दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी गाडयांच्या टेंडर बाबतीचा भ्रष्टचार माहिती अधिकारात मागीतलेल्या माहितीच्या आधारे उघड केला होता. त्या पत्रकार परिषदेत समाजसेवक उमेश भटकर, चंद्रकिशोर (पप्पु) यादव, वंबआ जिल्हा सदस्य भगीरथ वाळके, वंबआ कार्यकर्ते महेंद्र ठाकूर उपस्थीत होते.

त्या पत्रकार परिषदेत सर्व लेखी स्वरूपाचे पुरावे सादर करून देखील मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे आक्षेपार्ह विधान करीत यात काहीच तथ्य नाही असे सांगितले. परंतु या पदावरील जबाबदार व्यक्ती कडून अशी भाषा अशोभनीय आहे.

लेखी स्वरूपाचे सर्व पुरावे सादर करून ही पंकज सपाटे यांनी कुठल्याही कंत्राटदारावर अद्यापही कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. तसेच संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही केलेली नाही. यावरून पंकज सपाटे हे किती निष्क्रिय व बेजबाबदार व्यक्ती आहेत हे दिसून येते.

पंकज सपाटे यांचा निश्क्रीय व बेजबाबदार पणा उघड करण्यासाठी तसेच त्यांनी हे आरोप बिनबुडाचे व यात काही तथ्य नाही. हे विधान कितपत अयोग्य आहे हे दाखवण्यासाठी दिनांक 19/04/2022 रोजी पत्रकार परिषद घेऊन या सर्व बाबींचा खुलासा करीत सर्व गाडयांचे फोटो तसेच व्हिडीओ पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. जेणे करून पंकज सपाटे यांचे डोळे उघडतील व त्यांच्या हातुन होत असलेला भ्रष्टचार त्यांच्याच लक्षात येईल. या कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यास त्यांना मदत होईल.

या सर्व पुराव्यावरूनही जर पंकज सपाटे यांनी कार्यवाही केली नाही. व झालेल्या भ्रष्टाचारामुळे सरकारचा निधी सरकारच्या तिजोरीत वापस आणण्यास पाऊल उचले नाही तर वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांच्या सोबत समाजसेवक उमेश भटकर व चंद्रकिशोर (पप्पु) यादव हे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या विरोधात तिव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here