राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने बेबीताई उईके यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
कोरपना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शाखा गडचांदूरच्या वतीने बेबीताई उईके जिल्हाध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांचा जन्मदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. कोरोना चे संकट संपूर्ण विश्वावर आले आणि त्यात अनेकांचे आप्तस्वकीयांना ऑक्सिजन च्या अभावामुळे जीव गमवावा लागला. संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेच की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या अभंगातून सांगितल की वृक्ष आमचा प्राण आहे आणि ते आज खर ठरतंय. हा संदेश ध्यानीमनी ठेऊन पुन्हा एकदा वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी जिल्हासचिव प्रविण काकडे, जिल्हाउपाध्यक्ष सुनिल अरकीलवार, तालुकाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शरद जोगी, ता. सचिव प्रवीण मेश्राम, ता. उपाध्यक्ष करणसिंग भुराणी, गटनेता तथा नगरसेविका कल्पना निमजे, शहर अध्यक्षा तथा नगरसेविका अश्विनी कांबळे, नगरसेविका . मिनाक्षी एकरे, कार्याध्यक्ष प्रभा बेरड, विभा ताजने, नंदा वांढरे, विजया नामेवार, वंदना कातकडे, कविता गोरे, रुपाली खामनकर, अल्का गोरे,मंजुळ सातपुते, किंगरे मॅडम, आदी कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.