ऑपरेशन गंगामुळे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय सुखरूप

0
375

ऑपरेशन गंगामुळे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय सुखरूप

अनिशा शेख यांनी व्यक्त केल्या भावना ; भाजपा शिष्टमंडळाची भेट

 

राजुरा : रशिया व युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेन येथे अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने “ऑपरेशन गंगा” नावाने राबवलेल्या मोहिमेतून युद्धात होरपडलेल्या युक्रेन मधून हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशी सुखरूप आणण्याचे काम सुरू आहे. यात राजुरा येथील जवाहर नगर येथे राहणारी विद्यार्थिनी अनिशा करीम शेख ही वैद्यकीय शिक्षणा करिता युक्रेन मध्ये होती. ती नुकतीच युद्ध सुरू होण्याच्या अगोदर घरी परतली परंतु ती तिच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात असल्यामुळे तिने तिथली आपबीती भाजपाच्या शिष्टमंडळाला दिलेल्या भेटीत सांगितली.

भारतीय जनता पार्टी केंद्रीय नेततृत्वाने त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना युक्रेन मध्ये अडकलेल्या व सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटून माहिती घेण्याकरिता केलेल्या आव्हानानुसार विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार भाजप चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दखल घेऊन (दि.03) भाजप चे चंद्रपूर जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांना राजुरा येथे पाठवले त्यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर, सतीश धोटे, राजेंद्र डोहे, दिलिप वांढरे, प्रशांत घरोटे, सचिन शेंडे, शहजाद अली, सचिन बैस, जनार्धन निकोडे इत्यादींनी कु. अनिशा शेख सह आई वडिलांची भेट घेतली असता तिने पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी माझ्या सारख्या युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्या करिता तातडीने धाडसी निर्णय घेतल्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांचे जीव वाचल्याची भावना व्यक्त केली व घरी येऊन आस्थेने विचारपूस केल्याबध्दल उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here