वंचित बहुजन आघाडीची चंदनखेडा-मुधोली जिल्हा परिषद सर्कल बैठक संपन्न

0
488

वंचित बहुजन आघाडीची चंदनखेडा-मुधोली जिल्हा परिषद सर्कल बैठक संपन्न

आंबेडकर घराण्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या मंत्री नितिन राऊत यांचा निषेध

ओबिसी आरक्षणासोबत विविध विषयांवर चर्चा

 

भद्रावती : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काल (दि.३) ला चंदनखेडा-मुधोली जिल्हा परिषद सर्कलची बैठक चंदनखेडा येथील हनुमान मंदिर येथे घेण्यात आली.
सर्वप्रथम युक्रेन येथे मरण पावलेल्या विद्यार्थ्यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर घराण्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या नितिन राऊत याचा वंचित बहुजन आघाडी, भद्रावती शाखेकडून जाहीर निषेध करण्यात आला.
सदर बैठकीत ओबीसीचे आरक्षण प्रस्थापित पक्षांकडून जाणिवपूर्वक रोखले जात आहे, संघटन मजबूत असल्यामुळे धनशक्ती विरोधात लढा देण्यासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी तिसरा मोठा पर्याय आहे व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एकहाती सत्ता घेऊन जनकल्याणकारी कामे करणार, आदी विषयांवर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विदर्भ कार्यकारी सदस्य अरविंद सांदेकर, व चंद्रपुर जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली चंदनखेडा-मुधोली जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेकांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यात चंदनखेडा येथील अमर बागेसर, सुमीत मुन, विलोडाचे माजी सरपंच प्रशांत बागेसर, चोरा येथील सुनिल आसुटकर, कोकेवाडाचे संदीप डोंगरे, आष्टाचे गजानन लेंडगुरे, दिनेश नाने, प्रदिप गेडाम, वासुदेव गेडाम, धनराज काम, गजानन जुनारकर, विशाल जिवतोडे, निलेश डोंगरे, मारोती आडे, अनिल शेंडे, सुभाष नन्नावरे, ईत्यादींसह मोठ्या प्रमाणात युवकांचा पक्ष प्रवेश झाला.
या प्रसंगी जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हा कार्यकारी सदस्य कपुर दुपारे, तालुका निरिक्षक रूपचंद निमगडे, तालुकाध्यक्ष विजय इंगोले, महिला तालुकाध्यक्ष संध्याताई पेटकर, तालुका महासचिव अजय सोरदे, तालुका संघटक विशाल कांबळे, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक सुशील देवगडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here