राजुरा पोलिस देतात गुन्हेगारांना साथ…

0
927

राजुरा पोलिस देतात गुन्हेगारांना साथ…

सोनिया नगरवासीयांचा आरोप

सोनिया नगर मारहाण प्रकरण तापले

 

राजूरा, 5 मार्च : येथील काही गुंडांनी ज्यामध्ये विनोद जाधव उर्फ पापा, लल्ली शेरगिल, रणविर सरदार, रोशन व इतर दहा लोक यांचा समावेश आहे. या सर्वांनीच ०१ तारखेला रात्री १० च्या सुमारास सोनिया नगर येथील फुटपाथवर फळ विक्री करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबाच्या घरावर लाठ्या काठ्यांनी व लोखंडी रॉडने हल्ला चढविला. घरातील महिलांना देखील मारहाण केली व हे सर्व सुनियोजित, विचारपूर्वक केलेल्या योजनेद्वारे करण्यात आले.

या हल्ल्यामध्ये समीर शेख नावाच्या तरुणाचे डोके फोडण्यात आले. त्याची आई व बहीण यांना धक्काबुक्की करून त्यांना देखील लाकडी दांड्याने मारण्यात आले. त्यांच्या घराचे दार पूर्णतः तोडून आत मध्ये जबरदस्ती शिरून घरातील सामानाची तोडफोड देखील केली.

या सर्व गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक गुंडांना वाचविण्याच्या दृष्टिकोनातून- जीवघेणा हल्ला, महिलांचा विनयभंग, ४ पेक्षा अधिक लोकांनी घरावर हल्ला चढविला. त्यामुळे राइट्स अंतर्गत दाखल होत असलेला गुन्हा, या संदर्भामध्ये कायद्यामध्ये असलेल्या कलमा अंतर्गत कलमांचा वापर न करता, गुन्हेगारांना तात्काळ जामीन मिळावा अशा कलमा वापरल्या असल्याचा आरोप पीडित व संपूर्ण सोनिया नगर वासीयांनी राजुरा पोलिसांवर केला आहे.

या प्रकरणांमध्ये युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना पीडितांनी संपर्क करून मदत मागितली असता ठाकरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध असल्यामुळे तसेच संपूर्ण वॉर्ड हा या गुंडा विरोधात साक्ष देण्यास तयार असल्याने वॉर्ड वसियांच्या स्वाक्षरीनिशी सदर गुन्ह्यामध्ये कलम ३०७, ३५४, १२०B अंतर्गत वाढीव कलम लावून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सदर मागणी पूर्ण न झाल्यास पीडित परिवार आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती देखील त्यांनी एका पत्रकात दिलेली आहे.

यापूर्वीच दिनांक ०३ मार्चला उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा यांनी सदर गुन्हेगारांवर लवकरच तडीपारीची कारवाई करण्याचे आश्वासन सुरज ठाकरे तसेच सोबत असलेल्यांना, त्यांच्या कार्यालयामध्ये तक्रार देण्यास गेलेल्या पिडीतांना व वॉर्ड वासियांना दिलेले आहे.

परंतु या प्रकरणात दिनांक ०१ मार्चला आरोपी यांचे नातेवाईक प्रथम तन्वीर शेख व त्यांचे वडील यांचेकडून रस्त्यालगत लावलेल्या फळाच्या ठेल्यावर टरबूज घेण्यास गेले होते. मात्र टरबुजाचे पैसे मागितल्यामुळे आरोपीचा मामा व भाऊ हे त्या ठिकाणी संतापले. त्यांनी समीर शेख यांचे वडिलांना धक्काबुक्की करत खाली पाडले असता तन्वीर शेख हे आपल्या वडिलांच्या बचावा खातर आरोपीच्या साळ्याच्या व मामाच्या अंगावर धावून गेले व त्यांच्या मदतीला आजूबाजूचे त्या ठिकाणी उपस्थित असलेले लोक देखील धावले असल्याने त्यावेळी त्या ठिकाणाहून आरोपी पसार झाले. आरोपींनी पोलीस स्टेशन गाठले व तन्वीर शेख व त्याच्या वडिलांविरोधात तक्रार केली. त्यावरून पोलिस दुपारच्या सुमारास तन्वीर शेख व त्याच्या वडिलांना अटक करण्याच्या उद्देशाने पोलिस स्टेशनला घेऊन आले असता समीर शेख आपल्या वडील व भावाला सोडविण्यास पोलीस स्टेशनला गेले. मात्र यावेळी समीर शेख यांना जमानती साठी पैशांची मागणी करण्यात आली. पैशांची जुळवाजुळव करून समीर शेख यांनी आपल्या भावाची व वडिलांची सुटका पोलीस स्टेशन मधून करून घेतली. परंतु जामीनीच्या नावावर मागितलेल्या पैशाची पावती समीर शेख यांना पोलीस शिपाई गावतुरे यांनी दिली नसल्याचा गौप्यस्फोट समीर शेख यांनी केला आहे.

आता गावतुरे यांच्याविरोधात लेखी तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुरज ठाकरे यांनी करून या व्यवहारा संदर्भातील पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज देखील माहिती अधिकारांतर्गत मागितले आहे. व पोलीस शिपाई गावतुरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही भविष्यामध्ये होण्याचे संकेत सुरज ठाकरे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here