बामणी ग्रामपंचायत मध्ये शासकीय निधीची अफरातफर

0
591

बामणी ग्रामपंचायत मध्ये शासकीय निधीची अफरातफर

एकाच इमारतीचे दोन ठिकाणी बांधकाम!
ग्रा. प. पदाधिकारी व अभियंत्यांच्या नियोजन शुन्यतेचा कडस!

राज जुनघरे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर पंचायत समितीच्या कार्यकक्षेत येत असलेल्या बामणी ग्रामपंचायतीने नियोजन शुन्यतेचा कडस गाठला असुन बांधकाम अभियंता व पदाधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे एकाच इमारतीचे दोन ठिकाणी बांधकाम करण्याची वेळ आली आहे. यामुळे शासकीय निधीची अफरातफर होत असून चौकशी व कारवाईची मागणी येथील माजी उपसरपंच मोरेश्वर उदिसे यांनी केली आहे.
बामणी ग्रामपंचायत अंतर्गत मिनी अंगणवाडी बांधकामासाठी 8 .50 लक्ष रूपये शासनाच्या डि.पि.टि.सी. अंतर्गत मंजूर करण्यात आला. वार्ड क्रं.3 मध्ये पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जागेची निवड करून पंचायत समिती बांधकाम अभियंत्याने ले आऊट टाकले व रितसर बांधकाम सुरू झाले. पदाधिकार्यांनी रितसर भुमिपुजन नारळ फोडले. बांधकाम सज्जा लेवल येई पर्यन्त सर्व सुरडीत होते. आणि अचानक अंगणवाडी बांधकामाच्या नियोजित जागेवर मालकी हक्क सांगणारे जमिन मालक प्रकट झाले. आपला मालकी हक्क बजावत सुरू असलेले बांधकाम बंद पाडले. तदनंतर बामणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी चुक लक्षात येताच दुसरी जागा निवळ करून परत बांधकाम सुरू केले आहे.
ज्या अर्थी ग्रामपंचायत कडे गावठाण जागेचे व मालकी हक्काच्या जागेचे किंवा सरकारी जागेचे रेकारड उपलब्ध असतांना सदर जमीन कुणाची आहे हे सुध्दा कडु नये,ही बाब आश्चर्यकारक आहे. त्यातच प्रथमतः झालेल्या बांधकामांचा निधी व्यर्थ गेला असुन संबंधित खरचीत निधीची पदाधिकारी यांचे कडुन रिकव्हरी वसुल करावी व सदर गलथान कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून नियोजन शुन्य कारभार करणारे पदाधिकारी, अभियंता व ग्रामविकास अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी उपसरपंच मोरेश्वर उदिसे बामणी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here