त्रिवेणी जामखुर्द नदीच्या तीरावर महाशिवरात्रीची यात्राउत्सव  

0
325

त्रिवेणी जामखुर्द नदीच्या तीरावर महाशिवरात्रीची यात्राउत्सव  

आराध्याची भक्ती व स्नानासाठी हजारो भाविकांची उसळणार गर्दी

-पौराणीक पार्श्वभूमी लागलेल्या देवटेकडीच्या पायथ्याशी आहे गगनगिरीचे मंदिर

पोंभूर्णा :- तालुक्यातील अंधारी व उमा नदिचा संगम असलेल्या त्रिवेणी जामखुर्द देवटेकडी तिर्थक्षेत्रावर स्वामी जल तपस्वी दत्त गगनगिरी देवस्थान व हनुमान मंदिर असून येथे दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीची यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रिवेणी नदीतिर्थक्षेत्र काठावर वसलेल्या देवस्थान दर्शनासाठी गगनगिरी महाराजाचे भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात.

येथे काऱ्यारूकाच्या झाडांच्या वनावे वेढलेल्या देवटेकडीवर शिवशंभूचे जुने मंदिर आहे.या भागातील सर्वधर्माचे लोकं मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी व नवस बोलायला येतात.अनेकांसाठी हे स्थान श्रद्धेचे केंद्रस्थान आहे.

यावर्षी द्विवेणीवर तीन दिवसाची महाशिवरात्रीची यात्रा भरणार असून याची जय्यत तयारी देवस्थान कमेटीने सुरू केली आहे.यात्रेपुर्वीच येथे भाविकांची वर्दळ सुरू झाली असून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक,भक्त या ठिकाणी भेट देत आहेत.

अंधारी व उमा नदीच्या त्रिवेणी संगमाच्या नदिकाठावर हनुमानाचे मंदिर आहे.या देवटेकडीवर जुने शिवमंदिर असून येथे आदिवासी राजा दर्शनासाठी येत असल्याचे येथील जुने लोकं सांगतात. त्याचा संबंध वैरागड व घाटकुडशी असल्याचे सांगतात.येथे देवटेकडीवर आदिवासी राजा धर्म परिषद भरवित असायचा.या ठिकाणी आदिवासी समाज आजही मोठ्या संख्येने येथे जमा होवून शंभुशेक व माता जंगोमाताची पुजा अर्चा करतात.अंधारी व उमा नदिचे संगम असलेले त्रिवेणी तिर्थक्षेत्राच्या परिसरात नदि दुथडी भरून वाहत असली तरी त्याच्याने गगनगिरी मंदिराला कुठलेही नुकसान पोहचत नाही. गावकऱ्यांची व परिसरातल्या नागरिकांची तिर्थक्षेत्रावर मोठी श्रद्धा आहे.शेकडो वर्षांपासून येथे महाशिवरात्री यात्रा भरत आहे.त्रिवेणी नदिच्या संगमावर असलेल्या निसर्गरम्य परिसराचा वनपर्यटन तिर्थक्षेत्र म्हणून विकास झाल्यास येथे भक्तगण व पर्यटक असा दुहेरी फायदा येथे होऊ शकतो.सध्या या परिसराची देखभाल जामखुर्द वनसमिती करीत आहे.देवटेकडीवर मौल्यवान असलेल्या काऱ्यारुकाचे झाडं मोठ्या प्रमाणात आहेत.ते तालुक्यात इतरेतर कुठेच पाहायला मिळतात.या परिसराला वनपर्यटन तिर्थक्षेत्र म्हणून विकास झाल्यास काऱ्यारुकाच्या झाडांचे या निमित्ताने संवर्धन होऊ शकतो.

शासनाने या परिसराचा विकास केल्यास भक्तभाविक व पर्यटकांना होणारा त्रास होणार नाही.येथे धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी प्रशासनाने तातडीने करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.

——————————

त्रिवेणी देवटेकडीवर जुने शिवमंदिर आहे तसेच पायथ्याशी जलतपस्वी दत्त गगनगिरी महाराजाचे मंदिर असून या परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.हे ऐतिहासिक स्थळ आहे.आदिवासी समाजाची या परिसरात ऐतिहासिक धरोहर आहे.परिसराचा विकास झाल्यास येथील धार्मिक व पर्यटनाला अधिक महत्त्व येईल.

-धनराज बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत जामखुर्द

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here