अखिल भारतीय गोंडवाना आदिवासी संघटना: कारला येथे शहिद बिरसा मुंडा जयंती साजरी

0
446

अखिल भारतीय गोंडवाना आदिवासी संघटना:
कारला येथे शहिद बिरसा मुंडा जयंती साजरी

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती/चांदूर रेल्वे/कारला : बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.

इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.

यावेळी उपस्थित अखिल भारतीय गोंडवाना आदिवासी सर्व पदाधिकारी,व तसेच आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ कारला चे.मा.ज्ञानेश्वर कोळवते, राजेंद्र टेकाम, ज्ञानेश्वर परतेकी, अमोल वलके,श्रावण मसराम, रामकृष्ण बर्डे, कैलास सोनवणे,अजय भोंडे, राजेश वगारे, आकाश सहारे, बकारामजी भलावी, सुभाष भोयर,इंद्रपाल मोहोड, सचिन पाटील, गणपतराव मोहोड,श्रीधर बर्डे, रूंजाजी तोडासे. तंटामुक्ती अध्यक्ष अर्जून राठोड,ममताई बर्डे,पुनाजी राठोड,तसेच इतर सर्व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here