रोज मजुरांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयावर धडक!

0
338

 

नागपूर – सतत टाळेबंदी मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतांनी आता अनलॉकच्या परिस्थितीत, हाती आलेले मनरेगाचे काम प्रशासनाने हीसकविले. सरकारी रोजगार योजनेतील मनरेगा अंतर्गत रोजमजुरांना राज्य व केंद्र सरकार कडून प्रत्येकी १०० – १०० दिवस सलग काम देण्याचे आश्वासन सरकार कडून करण्यात येते.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका येथे मनरेगा योजनेतील कार्यरत जवळपास १५० ते २०० रोज मजुरांना कामा वरून अवघ्या पंधरा दिवसात काढून टाकण्यात आले, काही मजुरांनी या बाबतील विचारपुर केली असता त्यांच्याशी स्थानिक रोजगार सेवक तसेच इतर प्रशासकीय कर्मचार्‍यांकडून असभ्य वर्तवणूक केली गेली त्याच प्रमाणे ठराविक मजुरी न देऊन त्यांची पिळवणूक करण्यात येते. राज्याचे गृहमंत्री असलेल्या मा. अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील भोंगळ कारभार या निमित्ताने येरणी वर आला.

गोर गरीब, वंचित रोजमजुरांना यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणे हा सरकारचा अधिकार आहे. त्यांच्यावर भूकमारीची वेळ येऊ नये व हाताला काम उपलब्ध व्हावे करीता, एका आठवड्यात त्यांना काम मिळत नसल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला. त्या बाबतील नरखेड तालुक्यातील तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ७० – ८० मजुरांच्या अर्जा सहीत निवेदन देण्यात आले.

त्याठिकाणी अक्षय बांगर यांच्या नेतृत्वात तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रवक्ते सुमेध गोंडाने, युवा आघाडी प्रमुख श्रीकांत गौरखेडे, प्रमोदजी मडके, रामदास भोंगळे, केशव खंडारे, जयदेव बागडे, श्रावण हीवरकर, भनोदास गजभिये, योगेश खंडारे, चंद्रभान बागडे अन्य सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here