प्रलंबित मागण्यांसाठी – नर्सेस संघटनेचे चंद्रपूरात एक दिवसीय धरणा आंदोलन !शेकडाें भगिनींची उपस्थिती !

0
1521

प्रलंबित मागण्यांसाठी – नर्सेस संघटनेचे चंद्रपूरात एक दिवसीय धरणा आंदोलन !शेकडाें भगिनींची उपस्थिती !

🟥🟪🟡किरण घाटे🟥🟢प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधून त्या मागण्या त्वरीत पदरात पडाव्या या साठी आज बुधवार दि. २७जानेवारीला चंद्रपूरातील जिल्हा परिषद परिसरात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना चंद्रपूर यांचे वतीने एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले .या आयोजित एक दिवसीय धरणा आंदाेलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडाें नर्सेस आंदाेलनात सहभागी झाल्याचे चित्र आज प्रत्यक्षात दिसून आले.🛑🌀🟩🟥🟡🟢१२व २४वर्षाची कालबध्द पदाेन्नती तसेच १०,२०,३०ची कालबध्द पदाेन्नती मंजूर करण्यांत यावी , एल एच व्ही पदावर पदाेन्नती देण्यांत यावी भविष्य निर्वाह निधीची रक्कम एक महिण्यांच्या आत देण्यांत यावी , सेवापुस्तके अद्यावत करण्यांत यावे प्राथमिक आराेग्य केन्द्रातील रिक्त पदे जलद गतीने भरण्यांत यावे अश्या एकुन १५मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना चंद्रपूर शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिका-यांना सादर करण्यांत आले आहे .🟡🟢🟨💠🟩🌀या मागण्यांची त्वरित पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यांचा इशारा या संघटनेच्या अध्यक्षा इंदिरा लांडे , प्रतिभा नगराळे , जयंती रामटेके व संघटनेच्या काही पदाधिका-यांनी एका निवेदनातुन दिला आहे .🟥🟨💠काेराेना काळात याच नर्सेस भगिनींनी दिवस रात्र जिवाची बाजी लावून आपली सेवा दिली शासनाने त्यांना काेविड याेध्दे म्हणून त्यांचा मान सन्मान केला पण आज त्याच नर्सेस भगिनींना आपल्या रास्त व न्याय मागण्यांसाठी मंडप टाकुन धरणा आंदोलन करावे लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे🟪🟩🌀☀️ शासनाने या मागण्यां कडे लक्ष न पुरविल्यास येत्या १फेब्रुवारीला जिल्ह्यातील सर्व नर्सेस काळे फिती लावून काम करणार असल्याचे या संघटनेच्या काही पदाधिका-यांनी आज या प्रतिनिधीस सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here