चौत्र्या वरील अतिक्रमण हटवा

0
403

चौत्र्या वरील अतिक्रमण हटवा

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कायर येथे ग्रामपंचायत लगत असलेल्या जागेवर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांचा मृत्यू 1984 मध्ये झाल्यानंतर कायर ग्रामपंचायत व कायर् ग्रामवासीयांनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने स्मारक चौत्रा उभारण्यात आला. मात्र चकोतरा असलेल्या जागेवर गावातील काही मुजोर व्यक्तींनी अतिक्रमण करून. स्व. इंदिरा गांधी यांच्या चौत्र्यावर मुरूम माती टाकून बुजवून दिला. व त्यावर लोखंडी टिन पत्र्यांची शेड उभारून इंदिरा गांधी यांचे महत्त्व कमी केल्याने. त्यांच्या सन्मानाचा अपमान होत आहे. आणि आमच्या भावना प्रचंड दुखावल्या जात आहेत एक महिला असून भारताच्या पहिल्या पंतप्रधान देखील आहे. म्हणून ग्रामपंचायत कार्यालय कायर आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी तात्काळ अतिक्रमण हटवून गावकर यांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन गावातील काही समाजसेवक लोकांनी ग्रामपंचायत सरपंच यांना दिले आहे. अतिक्रमण हल्ल्यास गावकरी आपल्या पद्धतीने आंदोलन करणार अशा प्रतिक्रिया उमटत आहे.
मात्र ग्रामपंचायत प्रशासन अतीक्रमण हटविण्यास तयार आहे की नाही हाच खरा प्रश्न गावकर्‍यांमध्ये भेडसावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here