भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान व अपमान करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची भिम आर्मी ची मागणी

0
362

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान व अपमान करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची भिम आर्मी ची मागणी


प्रतिनिधी/रोहन कळसकर
चंद्रपूर जिल्ह्यातील तुकुम येथील रहिवासी असलेल्या मनोविकृत मानसिकतेच्या गणेश ज्ञानेश्वर हिंगे या समाजकंटकाने फेसबुक व व्हाटसॲप च्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होणार व जातीय दंगली घडवून येतील अशा प्रकारे विश्वरत्न, महामानव, क्रांतीसुर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अतिशय वादग्रस्त व आक्षेपार्ह विधान वक्तव्य करुन संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर समाजाच्या भावाना दुखविल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायी मध्ये आक्रमण व संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे या अतिशय गंभीर घटनेची दखल घेऊन भिम आर्मी चंद्रपूर व बल्लारपूर च्या भिम सैनिकांनी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांना लेखी तक्रार निवेदन देऊन आरोपी गणेश ज्ञानेश्वर हिंगे यांच्यावर ताबडतोब योग्य प्रकारे व कायदेशीर ॲट्राॅसिटी ॲक्ट अंतर्गत व इतर भारतीय कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. लगेच आरोपी गणेश ज्ञानेश्वर हिंगे यांच्या वर कलम 295 ( A) नुसार रामनगर पोलीसांनी कारवाई करुन आरोपीला अटक करण्यात आली. या वेळी निवेदन सादर करताना भिम आर्मी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र रायपूरे, भिम आर्मी बल्लारपूर शहर अध्यक्ष शशिकांत निरांजने, बबलू करमरकर, प्रदीप झामरे, परिश नगराळे, अमर धोंगडे , भारत थुलकर व इतर सर्व आंबेडकर अनुयायी व भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here