पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्रध्दांजली

0
392

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्रध्दांजली

 

अनाथांची माई पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याकरिता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, प्रसिध्दी प्रमूख नकूल वासमवार, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, विलास वनकर, विमल कातकर, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, हेरमन जोसफ, विजया बच्छाव, चंद्रशेखर देशमूख, कौसर खान, स्मिता वैद्य आदिंची उपस्थिती होती.

ज्येष्ठ समाज सेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककाळा पसरली आहे. आज त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधूताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी सिंधुताई सपकाळ यांच्या थोर कार्यांबाबत माहिती देत त्यांच्या जिवनप्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here