मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन च्या माध्यमातून बालदिवस उत्साहात साजरा

0
520

मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन च्या माध्यमातून बालदिवस उत्साहात साजरा

माझी शाळा माझी सुरक्षा हा उपक्रम पार पडला

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून १२ ते १६ या वयोगटातील विद्यार्थी करिता “ खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास ” स्केल हा उपक्रम राबवीत असून या उपक्रमा अंतर्गत कोरपना तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकरिता मुलांचे शिक्षण, आरोग्य, लिंग समानता, खेळण्याचा अधिकार, सामाजिक भावनिक शिक्षण, जीवन कौशल्य, सामाजिक विकास, बाल सुरक्षितता या बाबत जागरूकता व आवड निर्माण करण्याचे कार्य केले जाते. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालक दिन म्हणून साजरा केला जातो, त्याचेच औचित्य साधून मॅजिक बस इंडिया फौंडेशन अंतर्गत लखमापूर, कवठाला, नांदाफाटा येथील वर्ग 6 ते 10 च्या मुलांमध्ये चित्रकला, निबंध स्पर्धा घेऊन बालक दिन साजरा करण्यात आले. या कार्यक्रमात माझी शाळा, माझी सुरक्षा” या विषयावर कोविड 19 च्या काळात आपण स्वतः ची व इंतरांची सुरक्षा कशी घ्यावी या विषयावर चर्चा घडवून आणली. आज कोविड-19 च्या आपत्ती परिस्तिथीत शाळा पूर्णतः बंद आहेत परंतु शाळा सुरू होण्याच्या चर्चा होत आहे , शाळा सुरू झाल्यास आम्ही मूल म्हणून स्वतःची ची सुरक्षा काय असली पाहिजे, मी स्वतः कुठली काळजी घेतली पाहिजे यावर मुलांनी चित्रांद्वारे व सूचनांन द्वारे आपले मत व्यक्त केलेत या स्पर्धेत अनेक मुलांनी सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित पालकवर्ग यांचेही याविषयी मत जाणून घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे चंद्रपूर जिल्हा वरिष्ठ अधिकारी मा. प्रशांत लोखंडे, तालूका समन्वयक मनोज टप यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणात शाळा सहायक अधिकारी महेश होकर्णे व भूषण शेंडे, समुदाय संघटक शकुंतला पोयाम, सूचित वारारकर, वैशाली बोडे, कांचन निबुडे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here