कोतवांलाचे प्रश्न मार्गी लावा.

0
411

*कोतवांलाचे प्रश्न मार्गी लावा.* 

सुखसागर झाडे चामोर्शी तालुका प्रतिनिधी.

 चामोर्शी तालुका कोतवाल संघटनेनी मा. राज्यमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब इतर मागास, बहूजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. 

       महसूल विभागामध्ये कोतवाल हे प्रत्येक प्रशासकीय कामात कार्यतत्पर राहून महसूल गोळा करणे, दवंडी देणे अशी विविध कामे करून आपले कर्तव्य आणी जबाबदारी अल्पशा तुटपुंज्या मानधनावर काम करून कर्तव्य पार पाडतात . अनेक वर्षांपासून राज्यातील कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा द्यावा या करिता पायपीट चालू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणी नक्षलग्रस्त भागातील साजांवर काम करताना तारेवरची कसरत करून प्रशासकीय कर्तव्य पार पाडतात. 

 कोतवालांना इतर शासकीय कर्मचारऱ्या प्रमाणे नक्षलग्रस्त/प्रोत्साहन भत्ता देवून जिल्ह्यातील शिपाई वर्ग ४ ची पद्दे ४०% तात्काळ भरण्यास सहकार्य करावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. राज्य मंत्री विजय वडेट्टीवार साहेब यांना देण्यात आले. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीतदादा वंजारी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी साहेब कांग्रेस जिल्हाध्यक्ष गडचिरोली. व इतर दिग्गज मांन्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here