राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष शाहिनभाभी हकीम यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0
471

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष शाहिनभाभी हकीम यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

गडचिरोली:- ✍️सुखसागर झाडे

गडचिरोली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या महिलांचे कणखर नेतृत्व. तालुका कोरची पासून सिंरोचा पर्यंत म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील या टोकापासून तर त्या टोकापर्यंत महिलांची फळी तयार करणारे तसेच माजी. राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचे खंदे समर्थक शाहिनभाभी हकीम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी आष्टी येथे शाल श्रिफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान सुद्धा केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी.कार्याअध्यक्ष बबलुभैय्या हकिम,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,जिल्हा सचिव संजय कोचे, शहराअध्यक्ष विजय धकाते, कार्याअध्यक्ष कपिल बागडे प्रा.विठ्ठल निखूरे उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here